Fitness influencer Justyn Vicky Dainik Gomantak
ग्लोबल

Fitness influencer Justyn Vicky: 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात लोकप्रिय बॉडीबिल्डर जस्टिन विकीचा मृत्यू, शेवटचा क्षण कॅमेऱ्यात कैद

Justyn Vicky: आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बॉडीबिल्डर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर जस्टिन विकी याचे जिममध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले.

Manish Jadhav

Fitness influencer Justyn Vicky: आणखी एका लोकप्रिय बॉडीबिल्डरच्या निधनाची दु:खद बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बॉडीबिल्डर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर जस्टिन विकीचे जिममध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले.

बाली येथील फिटनेस जिममध्ये स्क्वॅट्स करताना विकीचा मृत्यू झाला. 210 किलो वजनाचा बारबेल त्याच्या मानेवर पडल्याने त्याची मान जागीच तुटली.

हृदय आणि फुफ्फुसांशी जोडलेल्या नसा दबल्याने जस्टिनचा काही वेळातच मृत्यू झाला. इंडोनेशियातील (Indonesia) बाली येथील जिममध्ये व्यायाम करत असताना हा अपघात झाला.

फिटनेस इन्फ्लुएन्सर जस्टिन विकी 33 वर्षांचा होता

चॅनल न्यूज एशियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना 15 जुलै रोजी घडली. जस्टिन विकी केवळ 33 वर्षांचा होता. वर्कआउट दरम्यान 210 किलो वजनाचा बारबेल त्याच्या मानेवर पडल्याने त्याची मान जागीच तुटली. हृदय आणि फुफ्फुसांशी जोडलेल्या नसा दबल्याने जस्टिनचा काही वेळातच मृत्यू झाला.

जस्टिन विकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये जस्टिन विकी पॅराडाईज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना दिसत आहे. स्क्वॅट्स करताना त्याला सरळ उभे राहता येत नव्हते. तोल गेल्याने तो पुन्हा खाली बसला. येथे व्हिडिओ पाहा -

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ फॅमिली फिजिशियन्सच्या मते, वेटलिफ्टिंग हा केवळ क्रीडा प्रशिक्षणासाठीच नव्हे तर सामान्य आरोग्य आणि फिटनेससाठी देखील सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे.

दुखापत किंवा मृत्यू टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपायांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशिक्षकांचे मत आहे. त्यामुळे वजन उचलण्यासाठी या मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.

नेहमी वॉर्म-अप आणि कूल-डाउन व्यायाम करा. वेट-लिफ्टिंगपूर्वी स्ट्रेचिंग एक्सरसाइज, कॅलिस्थेनिक्स आणि जॉगिंगसह वॉर्म अप करा.

वेटलिफ्टिंगमध्ये काय करावे

तुम्ही हेवी वजन उचलता तेव्हा स्पॉटर वापरा

वजन उचलताना तुमची पाठ सरळ ठेवा

वजन उचलण्याचे योग्य तंत्र वापरा

हेवी वर्कआउट करताना नेहमी शूज घाला

वेटलिफ्टिंगमध्ये काय करु नये

जर तुम्ही जड वजन उचलत असाल तर वेगाने श्वास घेऊ नका.

तुम्हाला काही वेदना होत असल्यास, वजन उचलणे सुरु ठेवू नका आणि ताबडतोब थांबवा.

आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा कोणत्याही स्नायूंचा व्यायाम करु नका.

स्पॉटर्सशिवाय जड वजन उचलू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT