USA Firing Dainik Gomantak
ग्लोबल

USA Firing: अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; चार ठार, अनेक जखमी

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका शाळेमधून गोळीबाराची घटना समोर आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेत बर्थडे पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यूएस मीडियाच्या मते, टेलिव्हिजन स्टेशन WRBL ने रविवारी पहाटे अलाबामाच्या डेडविले येथील एका इमारतीभोवती पोलिसांची प्रचंड हालचाल आणि घटनास्थळाजवळील हालचालींची माहिती दिली.

या घटनेबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश किशोरवयीन आहेत. WRBL च्या अहवालानुसार, या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की स्थानिक वेळेनुसार रात्री 10:30 च्या सुमारास एका किशोरवयीन मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाला. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका शाळेमधून गोळीबाराची घटना समोर आली होती. नॅशविले येथील एका प्राथमिक शाळेत एका महिला हल्लेखोराने गोळीबाराची घटना घडवली होती. नॅशव्हिल पोलिसांच्या वतीने, 28 वर्षीय महिला शूटर ठार झाल्याचे सांगण्यात आले.

मात्र, या घटनेमागील कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. अधिकारी आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत तीन मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ज्या शाळेत घडली ती प्री स्कूल होती. त्यात शिकणारी सर्व मुले 12 वर्षांपेक्षा कमी वयाची होती.

सकाळी 10.00 च्या सुमारास पहिला कॉल आला. 15 मिनिटांत अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गोळीबार करणाऱ्याला सुरक्षा दलांनी ठार केले. या घटनेमागे महिलेचा हेतू काय होता याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: ...तर मडगाव बकाल दिसले नसते! विकासकामांसाठी निधीचा व्यवस्थित वापर न झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

Hardik Pandya Record: हार्दिक पंड्याचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'! 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Bicholim Market: डिचोलीत बाजारपेठेला लाभला नक्षत्रांचा साज, नाताळाची लगबग; ख्रिसमससाठी खरेदी जोरात

Stray Cattles: रेडेघाटीतील भटक्या गुरांचा संचार आवरा, वाहनचालकांची मागणी; रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे मनस्ताप

सोनसोडो प्रकल्प परिसरात 20 टन वैद्यकीय कचरा, मडगाव पालिकेवर होणार कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस

SCROLL FOR NEXT