PM Sanna Marin  Dainik Gomantak
ग्लोबल

Finland Elections: PM सना मरिन यांचा दारुण पराभव, पार्टी करतानाचा व्हिडिओ व्हायरल...

Finland News: फिनलॅंडमध्ये रविवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. लोकप्रियता असूनही पंतप्रधान सना मरिन यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Manish Jadhav

Finland News: फिनलॅंडमध्ये रविवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. लोकप्रियता असूनही पंतप्रधान सना मरिन यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीला (SDP) तिसरे स्थान मिळाले. उजव्या पक्षांनी पहिले आणि दुसरे स्थान काबीज केले आहे. मात्र, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

दरम्यान, उजव्या विचारसरणीच्या नॅशनल अलायन्स पार्टीला (NCP) 20.8 टक्के मते मिळाली. नेशन फर्स्ट फिन्स पार्टीला 20.1 टक्के मते मिळाली. एसडीपीला 19.9 टक्के मते मिळाली. एकूण मतदानाची टक्केवारी 71.9 टक्के इतकी होती.

निवडणुकीच्या निकालावर नेते काय म्हणाले?

NCP चे नेते पेटेरी ऑरपो म्हणाले की, आमच्या धोरणांसाठी हा एक मजबूत जनादेश आहे. फिन्स पक्षाचे नेते रिक्का पुरा यांनी त्यांच्या पक्षाच्या इतिहासातील सर्वोत्तम निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मारिन यांनी निवडणुकीनंतर (Election) सांगितले की, ते तिसऱ्या क्रमांकावर असले तरी त्यांच्या मतांची टक्केवारी आणि खासदारांची संख्या गेल्या वेळेपेक्षा वाढली आहे, ही चांगली कामगिरी आहे.

मरीन 2019 मध्ये पंतप्रधान झाल्या

2019 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या मरिन यांनी कोरोना काळात देशाचे नेतृत्व केल्याबद्दल खूप कौतुक झाले होते. मात्र, फिनलॅंडच्या (Finland) वाढत्या कर्जाबाबत त्या विरोधी पक्षांच्या सातत्याने निशाण्यावर होत्या.

या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले

एका पार्टीदरम्यान डान्स आणि मद्यपान करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मरीन एका मोठ्या वादात सापडल्या होत्या. हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांच्या टीकाकार आणि समर्थकांमध्ये घमासान पाहायला मिळाले होते. दुसरीकडे, मरीन यांच्या समीक्षकांनी सांगितले की, त्यांचे वर्तन अशोभनीय होते.

मरीन युक्रेनला पाठिंबा देतात

मरीन युक्रेनच्या मोठ्या समर्थक आहेत. युक्रेन नाटोमध्ये सामील होण्यासही त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. संभाव्य नवीन पंतप्रधान पेटेरी ऑर्पो यांनी आश्वासन दिले की, फिनलॅंड त्यांच्या कार्यकाळातही युक्रेनच्या पाठीशी उभा राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT