FIFA World Cup Dainik Gomantak
ग्लोबल

FIFA World Cup: फुटबॉलच्या वैश्‍विक महासंग्रामात भारत कुठे?

FIFA World Cup 2026: पूर्वी आशियाला केवळ चार जागा मिळत होत्या, पण आता आठ संघ थेट पात्र ठरू शकतात त्यामुळे भारतासाठीही विश्‍वचषक पात्रतेची संधी अधिक वास्तववादी झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

शंभू भाऊ बांदेकर

‘फिफा’ने विश्‍वचषकातील संघ संख्या आता ४८ केली आहे. पूर्वी आशियाला केवळ चार जागा मिळत होत्या, पण आता आठ संघ थेट पात्र ठरू शकतात त्यामुळे भारतासाठीही विश्‍वचषक पात्रतेची संधी अधिक वास्तववादी झाली आहे. चार जागांसाठी स्पर्धा करणे खूप कठीण होते, पण आता आठ जागांमुळे आपल्या देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ फुटबॉल. या विश्‍वाला गवसणी घालणाऱ्या महासंग्रामास नुकतीच म्हणजे ११ जूनला सुरुवात झाली व ती भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ठिक १२.३० वा. अर्थात हा संग्राम भारतीय वेळेनुसार मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे असला तरी वेळकाळ न बघता एकचित्ताने हा महासंग्राम याचि देही, याची डोळा टीव्हीवर पाहण्याची सुवर्णसंधी गमावणार नाहीत.

१९३० मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर यावेळच्या या महाकुंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही आतापर्यंतच्या या खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असून यावेळी प्रथमच ४८ संघ फुटबॉलमधील सर्वोच्च विजेतेपदासाठी १०४ सामन्यांमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा महाकुंभ तब्बल महिनाभर सुरू असणार असून २० जुलै रोजी न्यू जर्सी येथील गेटलाइफ स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याचे या वैश्‍विक महासंग्रामाची सांगता होणार आहे. एकूण तीन देशांमध्ये विभागलेल्या १६ नामांकित शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

फुटबाॅल खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्‍वचषक ठरणाऱ्या २०२६ च्या विश्‍वचषकासाठी विकृमी म्हणजे ६५५ दशलक्ष डॉलर सुमारे ५ हजार सहाशे कोटी रुपये एवढा बक्षिस निधी जाहीर केला आहे.

या स्पर्धेत विश्‍वविजेत्या संघाला तब्बल ५० दशलक्ष डॉलर, उपविजेत्या संघाला ३३ दशलक्ष डॉलर, तर तिसऱ्या आणि चवथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे २९ व २७ दशलक्ष डॉलर एवढी बक्षिसे मिळणार अाहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला किमान ९ दशलक्ष डॉलर मिळणार आहेत. त्यामुळे यावेळचा विश्‍वचषक केवळ फुटबॉल खेळाचाच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही सर्वश्रेष्‍ठ महोत्सव म्हणून गणला जाणार आहे.

या स्पर्धेतील काही ठळक वैशिष्‍ट्ये म्हणजे मेक्सिकोत ही स्पर्धा धरुन तिसऱ्यांदा विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका ही स्पर्धा धरुन चौथ्यांदा विश्‍वचषकात सहभागी होणार आहे.

या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघांमध्ये ४० वर्षे वा त्याहून अधिक वयाच्या आठ विक्रमी खेळाडूंचा समावेश असेल, तर स्पर्धेत सहभागी होणारा सर्वांत वयस्कर खेळाडू हा स्कॉटलंडचा गोलकीपर क्रेग गॉर्डन हा असेल, त्यांचे वय स्पर्धेच्या वेळी ४३ वर्षे असेल, तर दुसरा सर्वांत वयस्कर खेळाडू इजिप्तचा एस्साम अल इदारी हा पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने २०१८ मध्ये सौदी अरेबियाविरूध्द वयाच्या ४५ व्या वर्षी सामना खेळला होता.

फुटबॉलच्या स्पर्धेमध्ये अत्यंत चविष्‍टपणे चर्चिला जाणारा एक विषय म्हणजे सर्वोत्तम खेळाडूचा ‘गोल्डन बुट’ कोणाला? यावेळी तब्बल ४८ संघांतून एकूण १ हजार दोनशे ४८ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत,पण एकच खेळाडू या सन्मानास पात्र होणार आहे.

सर्वोत्तम सुपरस्टार मध्ये लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू पेले यांच्या नावाने दुसरा पेले म्हणून ओळखला जाणारा ‍लियन एम्बागे यांची नावे आघाडीवर असताना, आता अनेक देशांतील नवे खेळाडू कौशल्याने पुढे आलेले आहेत, तेही आपले नशीब आजमावयाचा प्रयत्न करतील, यात शंका नाही.

फुटबॉल विश्‍वकरंडकात युरोप व दक्षिण अमेरिका या खंडातील देशांचेच आतापर्यंत वर्चस्व राहिलेले आहे. युरोपियन खंडातील देशांनी आतापर्यंत १२ वेळा आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांनी १० वेळा जेतेपद पटकावण्याची किमया करून दाखवली आहे. यंदाच्या विश्‍वकरंडकातही युरोपियन खंडातील फ्रान्स, स्पेन, इंग्लंड यामध्ये रस्सीखेच होईल, तर दक्षिण अमेरिकामधील ब्राझील व अर्जेंटिना चुरशीचा खेळ खेळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

त्याचबरोबर ‘क्लायमेट सेंटर’ या संस्थेच्या हवामान संशोधनानुसार हवामान बदलामुळे सुमारे ९७ सामने खेळाडूंसाठी चिंताजनक ठरू शकतात व त्यांचा परिणाम खेळाडूंच्या खेळावर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात ते तो सामना प्रत्यक्ष-अर्थात दूरचित्र वाहिनीवर पहिल्यानंतरच आपल्या लक्षात येऊ शकेल.

आतापर्यंतचे हे सगळे विश्‍वकरंडकाबाबत झाले. पण या फुटबॉलच्या वैश्‍विक महासंग्रामात आपला भारत देश कुठे आहे? हा एक मौलिक प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

याबाबत भाष्य करण्यापूर्वी २०२६ च्या विश्‍वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारताचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांचे विचार समजून घेणे उद्‌बोधक ठरेल. श्री भुतिया यांचे म्हणणे असे की, भारताच्या फुटबॉल विकासाठी युरोपियन देशांकडे पाहण्याबरोबरच उझबेकिस्तान आणि जॉर्डन सारख्या आशियायी देशांच्या या खेळातील प्रगतीचा अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरेल.

भारतातील फुटबॉलबाबत आशादायी चित्र सांगताना त्यांनी म्हटले आहे की, ‘फिफा’ने विश्‍वचषकातील संघ संख्या आता ४८ केली आहे. पूर्वी आशिया विभागात केवळ चार जागा मिळत होत्या, पण आता आठ संघ थेट पात्र ठरू शकतात त्यामुळे भारतासाठीही विश्‍वचषक पात्रतेची संधी अधिक वास्तववादी झाली आहे. चार जागांसाठी स्पर्धा करणे खूप कठीण होते, पण आता आठ जागांमुळे आपल्या देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

म्हणजेच, २०२६ च्या विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियासह आशियातील नऊ संघ सहभागी होत असल्याने भारतासाठीही भविष्यातील संधी वाढल्या आहेत, त्याचा आपण कसा लाभ उठवू शकू, यावर या क्षेत्रातील जाणकारांनी लक्ष केंद्रीत करणे व केंद्रातील क्रीडामंत्र्यांनीही याचा पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे.

आता आपला ‘एफसी गोवा’ संघही चांगली उभारी घेत आहे, याहून एखादा गोमंतकीय फुटबाॅल खेळाडूही भविष्यात आपले नशीब आजमावू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाढीव 'FAR'साठी नवी नियमावली; सरकारची न्यायालयात माहिती, सुधारित निकष लागू होईपर्यंत नव्या अर्जांवर प्रक्रिया नाही

B-52 Bomber Crash: टेकऑफ झाले अन् काही सेकंदातच होत्याचे नव्हते झाले! अमेरिकेचे महाकाय 'B-52 बॉम्बर' विमान कोसळले, 8 जणांचा जागीच मृत्यू

Griha Adhar Scheme: 'गृहआधार'चे अर्थसाहाय्‍य लवकरच 2 हजार, सरकारकडून हालचाली सुरू; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्‍कामोर्तब

Goa Congress: काँग्रेसची बैठक झाली; पण मला निमंत्रण नाही! गिरीश यांच्याशी मतभेत नाहीत

Goa Crime News: 'ती' अवघ्या 15 वर्षांची! बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आलं भयानक सत्य, उत्तर प्रदेशच्या तरूणाला बेड्या

SCROLL FOR NEXT