Oksana Shvets Twitter
ग्लोबल

रशियन हल्ल्यात युक्रेनची प्रसिद्ध अभिनेत्री ठार

युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेत्स हिचा रशियन सैन्याच्या बॉम्बहल्ला आणि रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन आता 20 दिवसांपेक्षा जास्त झाले आहे. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली होती. म्हणजेच आज युद्धाचा 23 वा दिवस आहे. युक्रेन-रशिया युद्धादरम्यान एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला तीव्र केला आहे. यादरम्यान रशियाने गुरुवारी कीववरही हल्ला केला, ज्यामध्ये युक्रेनची प्रसिद्ध अभिनेत्री ओक्सानाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (Oksana Shvets) हिचा रशियन सैन्याच्या बॉम्बहल्ला आणि रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ओक्साना ही एक प्रसिद्ध थिएटर कलाकार देखील होती. या वृ्ताला थिएटर कंपनी यंग थिएटरने दुजोरा देत आमची युक्रेनियन महान कलाकार ओक्सान यांचे निधन झाले आहे, असे म्हटले आहे.'द हॉलिवूड रिपोर्टर'नेही ओक्साना 67 वर्षांची असल्याचे सांगितले. तिला युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एक असलेल्या Honored Artist of Ukraine पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Ukrainian actress Oksana Shvets Killed)

600 हून अधिक युक्रेनियन ठार

गुरुवारी, रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले तीव्र केले. युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये रहिवासी भागांवर गोळीबार आणि रॉकेटही डागले जात आहेत. मात्र, रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विशेष ऑपरेशन केवळ युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. येथे, संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्त कार्यालयाच्या मते, युक्रेनमध्ये आतापर्यंत सुमारे 600 नागरिक मारले गेले आहेत आणि या संघर्षात 1,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक मुले त्यांच्या पालकांपासून विभक्त झाली आहेत.तर काही अनाथही झाली आहेत.

दरम्यान स्लोव्हाकियाच्या संसदेने रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या देशात 2,100 नाटो सैन्याच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दलात सुरुवातीला झेक प्रजासत्ताक, जर्मनी (Germany), नेदरलँड (Netherlands), युनायटेड स्टेट्स, पोलंड (Poland) आणि स्लोव्हेनियाचे सुमारे 1,200 सैनिक असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT