Evidence suggests that a deadly explosion at a market in the city of Kostiantynivka was caused by an errant missile fired by Ukraine:
प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुराव्यांवरून असे समोर आले आहे की, या महिन्याच्या सुरुवातीला पूर्व युक्रेनियन शहरातील कोस्टियन्टिनिव्हका येथील एका बाजारपेठेत प्राणघातक स्फोट युक्रेनने डागलेल्या चुकीच्या क्षेपणास्त्रामुळे झाला होता.
मात्र युक्रेनने म्हटले आहे की, 6 सप्टेंबरला झालेला स्फोट रशियन क्षेपणास्त्रामुळे झाला होता.
"प्रक्षेपणास्त्राचे तुकडे, उपग्रह फोटो, साक्षीदार आणि सोशल मीडिया पोस्टसह न्यूयॉर्क टाइम्सने गोळा केलेले आणि विश्लेषित केलेले पुरावे, असे सूचित करतात की हा जीवघेणा हल्ला बुक प्रक्षेपण प्रणालीद्वारे चुकीच्या युक्रेनियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्रामुळे झाला होता," असे न्यूयॉर्क टाइम्सने (New York Times) म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे की, सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये क्षेपणास्त्र युक्रेनियनच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाच्या दिशेने कोस्टियन्टिनिव्हकामध्ये उड्डाण करत असल्याचे दिसून आले आहे.
स्ट्राइकच्या काही मिनिटांपूर्वी, युक्रेनने कोस्टियन्टिनिव्हकाच्या वायव्येकडील 16 किमी अंतरावर असलेल्या ड्रुझकिव्हका शहरातून आघाडीच्या दिशेने दोन पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे सोडली होती.
हा हल्ला झाला तेव्हा 6 सप्टेंबरला युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मिहल म्हणाले होते की, कोस्टियन्टिनिव्हका बाजारपेठेवर रशियाने (Russia) केलेल्या हल्ल्यात 16 लोक ठार आणि 20 जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या कोस्तियानतिनिव्हका शहरावर कथित रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल क्लिपमध्ये क्षेपणास्त्र युक्रेनच्या डोनेस्तक प्रांतातील कोस्टियन्टिनिव्हकाच्या मध्यवर्ती बाजारपेठेत पडल्याचे दाखवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.