London Jagannath Temple Dainik Gomantak
ग्लोबल

Jagannath Temple in London: लंडनमध्ये साकारतेय युरोपमधील पहिले जगन्नाथ मंदिर; 'या' उद्योगपतीने दिले 254 कोटी रूपये

15 एकर जागेत होणार मंदिर, पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा

गोमंतक ऑनलाईन टीम

Jagannath Temple in London: ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये त्या देशातील पहिले जगन्नाथ मंदिर बांधले जाणार आहे. यासाठी ओडिया वंशाचे उद्योगपती बिस्वनाथ पटनायक यांनी 254 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

मंदिर उभारणीचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे मंदिर इंग्लंडमधील धर्मादाय आयोगाकडे नोंदणीकृत श्री जगन्नाथ सोसायटी (SJS) द्वारे बांधले जात आहे.

फिनेस्ट ग्रुपचे संस्थापक पटनायक आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कार हे मंदिराच्या बांधकामासाठी मुख्य देणगीदारांपैकी एक आहेत.

पटनायक यांच्या वतीने फिनेस्ट ग्रुपच्या कंपन्यांकडून 254 कोटी रुपये दिले जातील, असे कार यांनी सांगितले आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी 15 एकर जमीन खरेदी करण्यासाठी समूहाने 71 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित पहिल्या श्री जगन्नाथ संमेलनामध्ये भारतीय उच्चायुक्तालयाचे उपायुक्त सुजित घोष आणि भारताचे सांस्कृतिक मंत्री अमिश त्रिपाठी उपस्थित होते.

याशिवाय पुरीचे महाराज गजपती दिव्यसिंह देब हे महाराणी लीलाबती पट्टमहादेई यांच्यासोबत सामील झाले. याच परिषदेत पटनायक यांनी मंदिरासाठी 254 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले.

ते म्हणाले की, मंदिराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व भाविकांनी भगवान जगन्नाथावर श्रद्धा ठेवून काम करावे लागेल. मंदिरासाठी जमिन खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे.

मंदिर उभारणीच्या परवानगीसाठी पूर्वनियोजन अर्जही स्थानिक सरकारकडे सादर केला आहे. लंडनमध्ये बांधण्यात येणारे मंदिर हे युरोपातील पहिले जगन्नाथ मंदिर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT