Space Dainik Gomantak
ग्लोबल

युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळ मोहिमेतून रशियाला काढले बाहेर

नासा मंगळ मोहिमेत सहभागी होण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेन युद्धामुळे संतप्त झालेल्या युरोपियन स्पेस एजन्सीने (ESA) रशियन स्पेस एजन्सीला (Roscosmos) मंगळ मोहिमेतून बाहेर काढले आहे. आता या मोहिमेत रशियन शास्त्रज्ञ आणि अभियंते यांची मदत घेतली जाणार नाही. या मोहिमेसाठी येणारा खर्च सुमारे 8433 कोटी रुपये आहे.

यामध्ये युरोपीय देशांसह रशियाचाही समावेश होता. ही मोहीम सप्टेंबरमध्ये होणार होती. ईएसएचे महासंचालक जोसेफ एश्बॅशर यांनी सांगितले की, एक्सोमार्स हे रोव्हर मंगळावर वातावरणाची तपासणी करण्यासाठी पाठवले जाणार होते. मात्र आता पूर्वनियोजित वेळेला हे लॉन्चिंग होणार नाही, कारण सध्याची परिस्थिती चांगली नाही. युरोपीय देशांनी रशियाला (Russia) या मोहिमेतून बाहेर काढले आहे. आता या रोव्हरच्या लाँचिंगबाबत पुन्हा नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारी केली जाईल.

रशियाला मंगळ मोहिमेतून बाहेर काढल्यानंतर आता हे रोव्हर मंगळावर कसे नेले जाईल याचा अभ्यास केला जात आहे. यासाठी आता अमेरिकेची (America) अंतराळ संस्था नासासोबत बोलणी सुरू आहे. नासा (Nasa) या प्रकल्पात सहभागी होण्यास तयार असल्याचे जोसेफ एशबशर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT