रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील 137 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशिया पासून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओ संदेशात राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, रशियाला (Russia) त्यांना मारायचे आहे. (Russia Attack Ukraine Latest News Update)
झेलेन्स्की यांनीही रशियाला आपल्या कुटुंबासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की मी शत्रूंचे पहिले टार्गेट आहे, नंतर माझे कुटुंब. धोका पाहून माझे कुटुंब अज्ञातवासात गेले. राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, रशियाला युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखाची हत्या करून राजकीय दृष्ट्या नष्ट करायचे आहे.
केंद्र सरकारच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व लोकांसह ते सरकारी क्वार्टरमध्ये राहत असल्याचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. आपण आणि त्यांचे कुटुंबीय ‘देशद्रोही’ नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रपतींनी नागरिकांना चेतावणी दिली की शत्रू कीवमध्ये घुसला आहे. मी रहिवाशांना आवाहन करतो की सावधगिरी बाळगा आणि कर्फ्यूच्या नियमांचे पालन करा.
युक्रेनमध्ये 137 लोक मारले गेले
झेलेन्स्की यांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले की, रशियन हल्ल्यात देशातील 137 लोक मारले गेले आहेत. यामध्ये 10 अधिकारी आणि 13 सीमा रक्षकांचा समावेश आहे. या हल्ल्यात 316 जण जखमीही झाल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.