President Emmanuel Macron  Dainik Gomantak
ग्लोबल

Emmanuel Macron: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतीन यांना अल्टिमेटम; ''जर रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवकडे गेले तर...''

Emmanuel Macron Ultimatum to Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि नाटो यांच्यात तणाव वाढत असल्याचे दिसत आहे.

Manish Jadhav

Emmanuel Macron Ultimatum to Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि नाटो यांच्यात तणाव वाढत असल्याचे दिसत आहे. एकीकडे नाटोने युक्रेनच्या मदतीसाठी सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा धोका वाढू शकतो, अशी धमकी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी दिली आहे. यातच आता, फ्रान्सने थेट रशियालाच अल्टिमेटम दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी धमकीच्या स्वरात म्हटले आहे की, रशियाच्या सैन्याने कीव किंवा ओडेसाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी फ्रान्स युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्यास अजिबात उशीर करणार नाही.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत सांगितले की, पुतीन यांना आता हे समजून घ्यावे लागेल की नाटो रशियन सैन्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मॅक्रॉन यांनी यापूर्वीही युक्रेनमध्ये नाटो सैन्य पाठवण्याबाबत भाष्य केले आहे. युरोपीय नेत्यांच्या बैठकीत युक्रेन युद्धाबाबत झालेल्या चर्चेनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले होते की, भविष्यात युक्रेनमध्ये पाश्चात्य सैन्य पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

आम्ही कोणत्याही परिस्थितीत रशियाला जिंकू देणार नाही

काही दिवसांपूर्वी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पॅरिसमध्ये 20 युरोपियन राष्ट्रप्रमुख आणि इतर पाश्चिमात्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले होते की, ''रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान, रशिया जिंकू नये म्हणून आम्ही आवश्यक ते सर्व पावले उचलण्याचा प्रयत्न करु.'' मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आज जरी रशियाशी युद्धात सैन्य पाठवण्याबाबत एकमत झाले नसले तरी बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. मॅक्रॉन यांच्या आधी, युरोपियन नेत्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत रशियन सैन्याला रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबद्दल भाष्य केले होते.

अणुयुद्धाचा धोका वाढू शकतो

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि नाटो यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढत आहे. युक्रेनला मदत करण्यासाठी नाटोकडून सैन्य पाठवण्याचा प्रयत्न झाल्यास अणुयुद्धाचा धोका वाढू शकतो, असे पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन आपल्या भाषणात म्हणाले की, ''नाटो युक्रेनला युद्धात मदत करत आहे आणि काही काळापासून युक्रेनमध्ये नाटो सैन्य पाठवण्याबाबत बोलले जात आहे. ज्याने याआधी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा प्रयत्न केला त्याला त्याची किंमत चुकवावी लागली आहे. आता जर असे कोणी पाऊल उचलले तर परिस्थिती आणखी वाईट होईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT