Giorgia Meloni Emmanuel Macron Dainik Gomantak
ग्लोबल

फ्रान्सच्या अध्यक्षांचं 'Kiss' अन् मेलोनी यांची रिअ‍ॅक्शन; पॅरिसमधील भेटीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल Watch Video

Giorgia Meloni Emmanuel Macron Viral Video: सोशल मीडियावर मात्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील एका भेटीची जोरदार चर्चा रंगली.

Manish Jadhav

Giorgia Meloni Emmanuel Macron Viral Video: पॅरिसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या निमित्ताने जगाचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे असले, तरी सोशल मीडियावर मात्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील एका भेटीची जोरदार चर्चा रंगली. 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' सुरक्षितपणे खुली ठेवण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनने पॅरिसमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मेलोनी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचल्या, तेव्हा मॅक्रॉन यांनी त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत केले, त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

जेव्हा मेलोनी कारमधून उतरल्या, तेव्हा दारावर उभ्या असलेल्या मॅक्रॉन यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. फ्रान्सच्या संस्कृतीनुसार त्यांनी मेलोनी यांना मिठी मारली आणि त्यांच्या दोन्ही गालांवर 'किस' करुन अभिवादन केले. मात्र, या अनपेक्षित स्वागतावर मेलोनी यांनी दिलेली प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये दिसते की, मॅक्रॉन यांच्या या कृतीमुळे मेलोनी क्षणभर चकित झाल्या, त्यांच्या डोळ्यांत आश्चर्याचे भाव उमटले, मात्र त्यानंतर त्यांनी दिलेली स्मितहास्ययुक्त आणि मादक प्रतिक्रिया सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. या प्रसंगानंतर दोन्ही नेत्यांनी हसून हा क्षण हलका केला, परंतु इंटरनेटवर यावरुन मिम्सचा पाऊस पडत आहे.

या परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांसारखे दिग्गज नेते उपस्थित असतानाही मेलोनी आणि मॅक्रॉन यांच्यातील या 'केमिस्ट्री'नेच सर्वाधिक मौफिल लुटली. सोशल मीडियावर नेटकरी यावर मजेशीर टिप्पण्या करत आहेत. कोणी मॅक्रॉन यांच्या 'फ्रेंच चार्म'चे कौतुक करत आहे, तर कोणी मेलोनी यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे विश्लेषण करत आहे. "मेलोनींचे डोळे बरंच काही सांगून जात आहेत," अशा कमेंट्सनी फेसबुक आणि एक्स भरुन गेले.

एकीकडे या भेटीची चर्चा रंगात असताना दुसरीकडे ज्या होर्मुज सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर ही परिषद बोलावली होती, तिथून एक मोठी बातमी समोर आली. इराणने (Iran) ही सामुद्रधुनी सुरक्षितपणे खुली करण्याची घोषणा केली असली, तरी सोबतच अमेरिकेला धमकी दिली. जर अमेरिकेने आपल्या नौदलाची नाकेबंदी हटवली नाही, तर होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा बंद केली जाईल, असा इशारा इराणने दिला. अशा तणावपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर मॅक्रॉन आणि मेलोनी यांच्यातील हा हलकाफुलका आणि काहीसा विचित्र वाटणारा क्षण आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT