Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

मानवी मेंदूत बसणार आता मेमरी चीप; एलॉन मस्क प्रयोगाच्या आणखी जवळ

एलॉन मस्क संचालित ब्रेन-मशीन इंटरफेस कंपनी न्यूरालिंक क्लिनिकल चाचण्या सुरु करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे मेंदूच्या चिप्स मानवांमध्ये रोपण केले जातील.

दैनिक गोमन्तक

एलॉन मस्क संचालित ब्रेन-मशीन इंटरफेस कंपनी न्यूरालिंक क्लिनिकल चाचण्या सुरु करण्याच्या तयारी करत आहे. ज्यामुळे मेंदूच्या चिप्स मानवांमध्ये रोपण केली जाईल.

Dailymail.co.uk च्या मते, फर्म क्लिनिकल ट्रायल डायरेक्टरची नियुक्तीही करण्यात येत आहे. जे योग्य उमेदवार "काही तज्ञ डॉक्टर आणि शीर्ष अभियंत्यांसोबत काम करतील, तसेच न्यूरालिंकच्या पहिल्या क्लिनिकल चाचणी सहभागींसोबतही काम करणार आहेत." (Elon Musk Said Neuralink Hopes To Start Implanting Its Brain Chips In Humans In 2022)

दरम्यान, "तुम्ही न्यूरालिंकच्या क्लिनिकल रिसर्च अ‍ॅक्टिव्हिटीस सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर सातत्याने बदलणाऱ्या वातावरणासह नियामक परस्परसंवाद विकसित करण्यासाठी जबाबदार असलेल्या टीमला नेतृत्वही करता येणार आहे. मेंदूच्या गंभीर आजारांवर उपचार करणारी उपकरणे बनवण्यासाठी न्यूरालिंक लाँच करण्यात आले, परंतु त्यांचे दीर्घकालीन लक्ष्य 'मानवी संवर्धन' आहे.

तसेच, आयन एम. बँक्स यांच्या द कल्चर कादंबऱ्यांसह विज्ञाननिष्ठ कल्पनेतून ही कल्पना प्रेरित होती. मस्क यांनी या प्रकल्पाचे वर्णन 'कृत्रिम बुद्धिमत्तेसह सहजीवन' म्हणून केले आहे. जेणेकरुन AI ची कोणतीही संभाव्यता मानवी समाजासाठी धोकादायक ठरु नये याचाही विचार करण्यात आला आहे.

शिवाय, त्यांनी या गोष्टीची देखील पुष्टी केली आहे की, चिप संप्रेरक पातळी नियंत्रित करण्यास सक्षम असेल, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच चिंता कमी करण्यास मदत करण्याची क्षमता असेल. मस्क यांनी अनेकदा AI वर जास्त अवलंबून राहणे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यावर टीका केली आहे. त्यांनी अलीकडेच असाही दावा केला आहे की, AI कोणत्याही मानवापेक्षा "अत्यंत स्मार्ट" असेल आणि 2025 पर्यंत आपल्याला मागे टाकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT