Elon Musk Perfume  Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk Launch Perfume: एलन मस्क आता विकणार परफ्युम; एका बाटलीची किंमत 11 हजार 400 रूपये

सोशल मीडिया पोस्टनंतर दहा हजारावर बाटल्यांची विक्री; पुढील वर्षात बॉटल्सचे वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

Elon Musk Launch Perfume: टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी आता त्यांच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे. मस्क आता चक्क परफ्युम विकणार आहेत. मस्क यांनी एक नवा परफ्युम लाँच केला आहे. सोशल मीडियातून त्यांनी ही माहिती दिली आहे.

मस्क यांनी स्वतःचेच व्हेंचर असलेल्या द बोरिंग कंपनीच्या माध्यमातून 'बर्न्ट हेयर' नावाचा हा नवा परफ्युम लाँच केला. विशेष म्हणजे, मस्क यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर या परफ्युमच्या १० हजार बॉटल्सची विक्री झाली आहे.

मस्क यांनी हे प्रोडक्ट लाँच करताना आपल्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमध्ये बदल केला आहे. त्यांनी बायोमध्ये 'परफ्यूम सेल्समन' असे लिहिले आहे. मस्क यांनी पोस्टमध्ये या परफ्युमच्या बाटलीचा फोटोही शेअर केला आहे. तसेच 'द फायनेस्ट फ्रॅग्रन्स ऑन अर्थ' अशी कॅप्शनही दिली आहे.

या पोस्टमध्ये मस्क यांनी कंपनीच्या वेबसाईटची लिंकही शेअर केली आहे. या वेबसाईटवर हा परफ्युम खरेदी करता येईल. या परफ्युमची किंमत 100 डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय ग्राहकांसाठी या परफ्युमची किंमत 8400 रूपये इतकी ठेवली गेली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय शिपिंज चार्जेसचे 3000 रुपए स्वतंत्र लावले जातील. म्हणजेच या परफ्युमच्या एका बॉटलची किंमत भारतीय ग्राहकांना 11,400 रुपयांना मिळेल.

या पोस्टनंतर मस्क यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत 10 हजारहून अधिक बॉटल्सची विक्री झाल्याची माहिती दिली आहे. अर्थात या बॉटल्सचे वितरण 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये होणार आहे. DOGE या क्रिप्टोकरन्सीद्वारेही या परफ्युमची खरेदी करता येईल.

एलन मस्क हे सतत चर्चेत असतात. कधी ट्विट करून, कधी एखादी घोषणा करून. सप्टेंबरमध्ये जेव्हा मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत उतरणार असल्याचे सांगितले होते तेव्हा अनेकांना ती मस्करी वाटली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT