Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Elon Musk ने Twitter विकत घेतले, 'पण...'

जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांनी विकत घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी विकत घेतले आहे. ब्लूमबर्गने सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO), सीईओ पराग अग्रवाल आणि चेअरमन ब्रेट टेलर अद्यापही या पदावर कार्यरत आहेत. याचा अर्थ ते सध्या कंपनीशी निगडीत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून ते या पदावर आहेत. एलन मस्क सातत्याने ट्विटरच्या बोर्डावर आपला रोष व्यक्त करत आहेत. (Elon Musk bought Twitter but who will run it now)

एलन मस्क (Elon Musk) हे ट्विटर ज्या पद्धतीने चालवले जात होते, त्यावर ते खूश नव्हते. जेव्हा एखादी कंपनी विकत घेतली जाते तेव्हा त्याचे व्यवस्थापन बदलणे सामान्य आहे. पण एलन मस्क हे आधीच टेस्ला (TESLA) आणि SpaceX (SPACEX) चे सीईओ आहेत. यामुळे, दुसर्‍या कंपनीत प्रमुख नेतृत्वाची भूमिका घेण्याची एलन मस्क यांची क्षमता मर्यादित असू शकते.

आता ट्विटर कसे चालले आहे?

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आहे. एलन मस्क यांनी या व्यासपीठावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचार करण्याच्या योजनेबद्दल सांगितले आहे. एलन मस्क यांनीही युजर्सच्या ट्विटच्या मॉडरेशनमध्ये कडक मॉडरेशनची तक्रार केली आहे. एलन मस्क आणि ट्विटर यांच्यातील कराराच्या घोषणेपूर्वी मस्क यांनी ट्विट करत म्हटले होते की, "मला आशा आहे की माझे सर्वात वाईट टीकाकार देखील ट्विटरवर असतील." कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे."

त्याचवेळी एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, पराग अग्रवाल यांना ट्विटरवरुन डिस्चार्ज मिळू शकतो. न्यूज एजन्सी रॉयटर्सने रिसर्च फर्म इक्विलारच्या हवाल्याने म्हटले आहे की, जर अग्रवाल यांना 12 महिन्यांत ट्विटरवरुन काढून टाकले तर कंपनीला त्यांना $42 दशलक्ष इतकी रक्कम द्यावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT