Egypt Trains Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Egypt Trains Accident: रेल्वे प्रवाशांवर काळाचा घाला! इजिप्तमध्ये दोन रेल्वे गाड्यांची जोरदार टक्कर; 4 ठार, 88 जखमी

Egypt Train Collision Giza Al Ayyat 2026: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील गिझा प्रांतातील अल-अय्यात जिल्ह्यात रविवारी (10 नोव्हेंबर) दोन प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाल्याची दुर्घटना घडली.

Manish Jadhav

Egypt Trains Accident News: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील गिझा प्रांतातील अल-अय्यात जिल्ह्यात रविवारी (10 नोव्हेंबर) दोन प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाल्याची दुर्घटना घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, 88 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. इजिप्तच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फय्यूम प्रांताच्या दिशेने जाणाऱ्या एका रेल्वेने असवान प्रांताकडे जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेमुळे एक रेल्वेगाडी रुळावरुन खाली घसरली, मात्र नेमकी कोणती गाडी घसरली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, सर्व जखमींना उपचारासाठी परिसरातील रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

या दुर्देवी दुर्घटनांमुळे इजिप्तमध्ये खळबळ उडाली असून, देशाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सीसी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, या भीषण अपघातास दोषी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी निश्चित करुन कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाने घटनास्थळावरील मलबा हटवण्यासाठी आणि रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी क्रेन व इतर यंत्रसामग्री तैनात केली. विशेष म्हणजे, याच अल-अय्यात जिल्ह्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही दोन मालगाड्यांमध्ये टक्कर झाल्याची दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये चालक आणि त्याचा सहायक जखमी झाले होते.

दुसऱ्या एका घटनेत, आफ्रिका खंडातच केन्यामधील माकुएनी येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या आणखी एका भीषण रस्ते अपघातात 22 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले. बसमधील सर्व प्रवासी एका अंत्यविधीवरुन परतत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात (Accident) घडला. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच याच महामार्गावर झालेल्या अन्य एका अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे वाढत्या रस्ते आणि रेल्वे अपघातांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रमोशन अन् व्यवसायात नफा! ग्रह-ताऱ्यांच्या चालीने बदलणार सोमवारचा दिवस; 'या' राशींनी लागणार लॉटरी

IPL Auction 2027: आयपीएलमध्ये 40 कोटींची बोली लागणार? 'या' 3 खेळाडूंवर फ्रँचायझींची नजर; अभिषेक, बुमराहलाही मिळू शकते मोठी रक्कम!

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

SCROLL FOR NEXT