Egypt First Female Pharaoh Researchers Found 5000 Year Old Wine Dainik Gomantak
ग्लोबल

इजिप्तशियन राणीच्या कबरीत सापडले 5,000 वर्षे जुने वाइनचे भांडार, वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा

Researchers Found 5000 Year Old Wine: इजिप्तच्या पहिल्या महिला राणीच्या कबरीत 5,000 वर्षे जुने वाइनचे भांडार सापडले आहे.

Manish Jadhav

Egypt First Female Pharaoh Researchers Found 5000 Year Old Wine: इजिप्तच्या पहिल्या महिला राणीच्या कबरीत 5,000 वर्षे जुने वाइनचे भांडार सापडले आहे. संशोधकांनी सांगितले की, वाइनचा साठा सुमारे 3000 ईसापूर्व आहे. व्हिएन्ना विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी वाइनच्या साठ्याचा शोध लावला आहे. इजिप्तच्या फर्स्ट लेडीची कबर नाईल नदीपासून 10 किमी अंतरावर आहे.

रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांच्या पथकाने अबीडोसच्या शाही नेक्रोपोलिसमधील मेरेट-नीथच्या कबरीत वाइनचे भांडार शोधून काढले. असे म्हटले जाते की, मेरी-नीथ सुमारे 5,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आणि सुमारे 2950 ईसापूर्व इजिप्तची राणी होती.

राणीला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाइन टाकून पुरण्यात आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जप्त केलेले काही दारुचे जार अजूनही सीलबंद आहेत. शास्त्रज्ञांनी (Scientists) सांगितले की, जप्त केलेली वाइन राणीच्या संपत्तीची साक्ष देते.

वाइनच्या जारसह, शास्त्रज्ञांनी द्राक्षाच्या बिया आणि वाइनचे अवशेष देखील शोधले. मेरी-नीथची कबर कशी बांधली गेली हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संशोधकांनी नवीन पुरातत्व तंत्रांचा वापर केला. अहवालानुसार, वीट, माती आणि लाकूड वापरुन बांधलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये राणीसोबत दफन करण्यात आलेल्या 41 दरबारी आणि नोकरांच्या कबरी आहेत.

विश्लेषणातून असे दिसून आले की, राणीचे स्मारक एका वेळी नाही तर थोड्या-थोड्या अंतराने बांधले गेले. इतर संशोधन असेही सूचित करते की, दरबारी आणि नोकरांना आदर म्हणून राणीबरोबर दफन केले गेले. राणीच्या कबरीचा शोध सर्वप्रथम ब्रिटिश इजिप्तोलॉजिस्ट सर फ्लिंडर्स पेट्री यांनी 1899-1900 मध्ये लावला होता.

दुसरीकडे, व्हिएन्ना विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ क्रिस्तियाना कोहलर यांनी सांगितले की, राणी मेरी-नीथ कदाचित तिच्या काळातील सर्वात शक्तिशाली महिला होती. ते म्हणाले की, आजच्या संशोधकांचा अंदाज आहे की ती प्राचीन इजिप्तची (Egypt) पहिली राणी असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT