Earthquake
Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

चीनच्या शिनजियांग प्रदेशात भूकंपाचा धक्का

दैनिक गोमन्तक

जपान हा भुकंप प्रवण क्षेत्रात येत असलेला देश आहे. याच क्षेत्रात येत असलेला चीन मात्र या भुकंप प्रवण क्षेत्रापासून काहीसा सुरक्षित असल्याचे चीत्र आहे. असे असले तरी चीनमध्ये ही भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशात आज दुसऱ्यावेळा 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. ( Earthquake of magnitude 5 2 in xinjiang china second time )

चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू 40.88 अंश उत्तर अक्षांश आणि 78.14 अंश पूर्व अक्षांशावर आढळून आला. या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर आहे, अशी माहिती वृत्तसंस्था शिन्हुआने सीईएनसीने दिली आहे. शनिवारी पहाटे 3.29 वाजता चीनच्या शिनजियांग भागात भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी नोंदवण्यात आली. याशिवाय, चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर नुसार, नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील आबा तिबेटो-कियांग स्वायत्त प्रीफेक्चरच्या मेरकांग शहरात शुक्रवारी सकाळी 00:03 वाजता 5.8-रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

शहराच्या भूकंप मदत मुख्यालयाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शहरात झालेल्या भूकंपामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी, शहराच्या भूकंप मदत मुख्यालयाने सांगितले होते की, या भूकंपामुळे एकूण 13,081 लोक प्रभावित झाले होते, परंतु नवीन आकडेवारीनुसार ही संख्या लक्षणीय वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT