Dubai Hindu Mandir Dainik Gomantak
ग्लोबल

Dubai Hindu Mandir: दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार दूबईत हिंदू मंदिराचे उद्घाटन

Dubai Hindu Mandir News: दुबईत राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांना दसऱ्याच्या दिवशी मोठी भेट मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

Dubai Hindu Mandir: दुबईत राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांना रामनवमीच्या निमित्ताने मोठी भेट मिळणार आहे. दुबईमध्ये (Dubai) पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे हिंदू मंदिर बांधायला बरीच वर्षे लागली आहेत. खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, हे मंदिर सिंधू गुरु दरबार मंदिराचा (Temple) विस्तार आहे जे दुबईतील सर्वात जुने मंदिर आहे.

या मंदिराची पायाभरणी 2020 मध्येच झाली होती. या मंदिराच्या उभारणीने दुबईत राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 ऑक्टोबरपासून या मंदिरात सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर या मंदिरात 16 देवतांच्या मूर्ती आहेत. हिंदू धर्मीयांबरोबर कोणत्याही जातीचे लोक या मंदिरात प्रवेश करू शकतील, असे अहवालात सांगण्यात आले होते.

मंदिराच्या छतावर घंटा लावण्यात आली आहे

अनौपचारिकपणे हे मंदिर 1 सप्टेंबर रोजी उघडण्यात आले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत हजारो लोकांनी मंदिराच्या रचनेपासून त्याची भव्यता पाहिली आहे. हे मंदिर बांधण्यासाठी पांढऱ्या संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराच्या छतावर घंटा बसवण्यात आली असून ती पूर्णपणे हिंदू भौमितिक रचनेने बनवण्यात आली आहे.

मंदिरात प्रवेश करण्याची हीच वेळ असेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बुकिंग करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी क्यूआर कोड (QR Code) आधारित बुकिंग प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेबसाइटवरून बुकिंग करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश करण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT