North Korea Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरियामध्ये दुष्काळजन्य स्थिती, अन्नासाठी नागरिक बेहाल

देशाने आपत्कालीन लष्करी साठ्यातून नागरिकांना तांदूळ पुरवला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियामध्ये (North Korea) अन्नधान्याची कमतरता (Food shortage) वाढत असताना, देशाने आपत्कालीन लष्करी साठ्यातून नागरिकांना तांदूळ पुरवला आहे. दक्षिण कोरियाच्या (South Korea) गुप्तचर संस्थेने मंगळवारी ही माहिती दिली. उष्ण वारे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे देशात अन्न संकट निर्माण झाले आहे. कोविड -19 (Covid 19) महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. परंतु मोठ्या प्रमाणात उपासमार आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले परंतु या चिंताजनक परिस्थितीचे कोणतेही वृत्त उत्तर कोरियन वृत्तपत्रामध्ये आलेले नाही. निरीक्षकांनी इशारा दिला आहे की, उत्तर कोरियातील संकट आणखी गडद होईल.

सोलच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने (एनआयएस) संसदीय समितीच्या एका गुप्त बैठकीत सांगितले की, उत्तर कोरिया युद्धाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा साठा नागरिक, इतर कामगार आणि ग्रामीण सरकारी संस्थांसाठी वापरत आहे. या बैठकीला उपस्थित असलेले एक आमदार हा ताए-केउंग (Ha Tae-keung) यांनी एनआयएसला सांगितले की उत्तर कोरियामध्ये गरम वारे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे भात, मका आणि इतर पिके आणि गुरे नष्ट झाली आहेत. ते म्हणाले की एनआयएसने म्हटले की उत्तर कोरियाचे नेतृत्व दुष्काळाशी लढणे हा राष्ट्रीय अस्तित्वाचा मुद्दा मानतो आणि आपल्या मोहिमेबद्दल जनजागृती करण्यावर भर देत आहे.

उत्तर कोरियामध्ये 1 दशलक्ष टन अन्नाची कमतरता

किम ब्युंग-की या आणखी एका विधिज्ञाने एनआयएसच्या हवाल्याने म्हटले आहे की, उत्तर कोरियाला आपल्या 26 दशलक्ष लोकांना पोसण्यासाठी साधारणपणे 5.5 दशलक्ष टन अन्नधान्याची आवश्यकता आहे. पण सध्या 10 लाख टन अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे. एनआयएसने कायदेकर्त्यांना सांगितले की, उत्तर कोरिया धान्य साठा संपत आहे. तांदूळ हे उत्तर कोरियातील सर्वात महत्वाचे पीक आहे, ज्याची किंमत या वर्षाच्या सुरुवातीपासून दोनदा वाढली आहे. किम, एनआयएसचा हवाला देत म्हणाले की, जुलैमध्ये किंमत स्थिर राहिली, पण ती पुन्हा एकदा वाढली आहे.

चीन उत्तर कोरियाला मदत करु शकतो

कायदेत्यांनी उत्तर कोरियाची अन्नधान्याची टंचाई किंवा ते काय पावले उचलत आहेत याबद्दल सविस्तर सांगितले नाही. गेल्या काही वर्षांत उत्तर कोरियामध्येही अशा प्रकारचे अन्न संकट दिसून आले. परंतु चीनच्या (China) मदतीने परिस्थिती हाताळली गेली. सध्या उत्तर कोरियाचे नागरिक महागाईच्या भावात तांदळासह इतर धान्य खरेदी करत आहेत. तथापि, यावेळी देखील, तज्ञांचा असा विश्वास आहे की चीन उत्तर कोरियाच्या मदतीसाठी पुढे येईल आणि त्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळ टाळण्यास मदत करेल. खरं तर, उपाशीपोटी उत्तर कोरियाच्या नागरिकांनी चीनला पळून जाण्याची भीती वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

SCROLL FOR NEXT