Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे अर्ध्या रस्त्यातचं उतरले डोनाल्ड ट्रॅम्प

या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे इंजिन गेल्या आठवड्याच्या शेवटी मेक्सिकोच्या आखातावर बिघडले. यामुळे विमानाचे न्यु ऑर्लिन्स येथे इमर्जन्सी लॅंडींग करावे लागले. 'पॉलिटिको'ने सर्वप्रथम ट्रॅम्प यांच्या विमानाच्या इमर्जन्सी लॅंडींगची बातमी दिली आहे.

* फ्लोरिडाच्या परतीवर असतांना इंजिनमध्ये बिघाड

बुधवारी, या घटनेसंबंधित माहिती मिळाल्यावर एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याची पुष्टी केली. अधिकाऱ्याच्या म्हण्यानुसार, न्यु ऑर्लीन्समध्ये रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या देणगी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ट्रॅम्प यांनी त्यांच्या फ्लोरिडा इस्टेटला देणगीदाराच्या खाजगी विमानात धडक डिली तेव्हा शरिवारी रात्री 11 वाजण्याच्या काही वेळापूर्वी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि मार-ए- लागो येथे परतले.

* ट्रॅम्प यांचे अनेक सल्लागार होते

न्यु ऑर्लीन्स लेकफ्रंट विमानतळापासून सुमारे 120 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ट्रॅम्प यांच्या विमानाचे एक इंजिन खराब झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅम्प हे त्यांचे सल्लागार, गुप्तचर विभागाचे कर्मचारी आणि सपोर्ट स्टाफसोबत विमानात प्रवास करत होते. माजी राष्ट्रपतिच्या प्रवक्त्याने त्यांच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग झाल्याचे मान्य केले. मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, ट्रॅम्प शीर्ष रिपब्लिकन देणगीदारांशी संवाद साधण्यासाठी न्यु ऑर्लिन्समधील फोर सीझन्स हॉटेलमध्ये पोहोचले होते.मिळालेल्या अहवाल असे म्हंटले आहे की इमर्जन्सी लॅंडींगनंतर ट्रॅम्पच्या टीमने दुसऱ्या अधिकाऱ्याकडून विमानाची व्यवस्था केली, त्यानंतर माजी अध्यक्ष ट्रॅम्प मार-ए-लागो येथे पोहोचले. पण या घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी झाल्यांची माहिती समोर आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT