Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

Trump Claim Iran Surrender Negotiations: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा दावा केला.

Manish Jadhav

Trump Claim Iran Surrender Negotiations: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा दावा केला. इराण आता पूर्णपणे नरम पडला असून तो अमेरिकेसोबत तडजोड करण्यास तयार झाला, असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यांच्या मते, इराणने प्रस्तावित 15 कलमी शांतता योजनेतील बहुतांश मुद्द्यांवर आपली संमती दर्शवली असून लवकरच दोन्ही देशांमध्ये एक मोठा ऐतिहासिक करार होण्याची शक्यता आहे. इराणसोबत एका बाजूला युद्ध सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला थेट आणि अप्रत्यक्ष चर्चाही सुरु असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या चर्चेचा सकारात्मक निकाल लवकरच जगासमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ट्रम्प यांनी इराणच्या बदललेल्या भूमिकेचे उदाहरण देताना सांगितले की, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेचे 20 मोठे तेलवाहू टँकर कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ दिले आहेत. ही बाब इराण आता संघर्षापेक्षा कराराला प्राधान्य देत असल्याचे संकेत देत आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. 28 फेब्रुवारीपूर्वी इराणसोबत झालेल्या चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्या होत्या. इराण आपला अणू कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करणे थांबवण्यास तयार नव्हता, म्हणूनच अमेरिकेला (America) लष्करी कारवाई करावी लागली. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर इराण अजूनही पूर्णपणे सुधारला नाही, तर अमेरिका जमिनीवरुन मोठा हल्ला करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणसोबत केलेला अणू करार हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट करार होता, अशी टीका ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केली. "जर माझ्या सरकारने तो करार रद्द केला नसता, तर आज इराणकडे अणू शस्त्रे असती आणि संपूर्ण जग त्याच्या पायाखाली असते. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही," असे ट्रम्प ठामपणे म्हणाले. इराणच्या अणू तळांवर बॉम्बहल्ले करुन त्यांचा अणू कार्यक्रम उद्ध्वस्त केल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या मते, इराणमधील जुने नेतृत्व आता पूर्णपणे नष्ट झाले असून नवीन पिढीकडेही आता सत्ता टिकवण्याचे बळ उरलेले नाही.

इराणमधील (Iran) सत्तापालटाचा उल्लेख करत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, आजवर अमेरिका कोणत्याही देशाशी ज्या पद्धतीने वागली नाही, त्या कठोर पद्धतीने इराणशी निपटले आहे. जरी कराराची शक्यता दिसत असली, तरी तो करार होईलच याची 100 टक्के खात्री देता येत नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इराणकडे अमेरिकेच्या अटी मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे चित्र ट्रम्प यांनी रंगवले. या दाव्यामुळे जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या संभाव्य कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

SCROLL FOR NEXT