donald trump and xi jinping Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Donald Trump China Spying Claim: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी चीनच्या मुद्द्यावर एक अत्यंत खळबळजनक आणि रोखठोक वक्तव्य केले.

Manish Jadhav

Donald Trump China Spying Claim: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी चीनच्या मुद्द्यावर एक अत्यंत खळबळजनक आणि रोखठोक वक्तव्य केले. चीन अमेरिकेची हेरगिरी करतो आणि अमेरिकादेखील चीनच्या बाबतीत तेच करते, असे ट्रम्प यांनी उघडपणे मान्य केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली. जिनपिंग यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत जवळपास सर्वच महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल, असा स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिला.

चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 23 सप्टेंबर रोजी अमेरिकेत (America) दाखल होणार असून 24 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊस येथे ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात हाय-व्होल्टेज भेट होणार आहे. यापूर्वी जून महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः चीनचा दौरा केला होता, ज्यामध्ये उभय नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. आता व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या या बैठकीत हेरगिरी, व्यापार आणि जागतिक सुरक्षेवर काय चर्चा होते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

आपल्या आयरलँड दौऱ्यावरुन परतताना एयर फोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी 2028च्या आगामी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवरही भाष्य केले. सध्याचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार का, या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, निवडणुकीला अजून बराच वेळ शिल्लक आहे. पक्षाकडे जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासह अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत.

यावेळी ट्रम्प यांनी कॅनडासोबतच्या व्यापारी संबंधांवरही ताशेरे ओढले. कॅनडासोबत व्यापार करार करणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे, परंतु ते भारताप्रमाणे अमेरिकेसोबत डील करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावावर बोलताना, आखाती देश इराणच्या जवळ जात असल्याबद्दल आपल्याला कोणतीही चिंता नाही, असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात नव्या वादाला तोंड दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT