Trump and Xi Jinping viral banquet video Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: 'चीअर्स'...! ट्रम्प साहेब, अमेरिकेत चहा आणि चीनमध्ये शॅम्पेन? जिनपिंगसोबतच्या शाही मेजवाणीतील व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण

Donald Trump Champagne Sip Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून, त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले.

Manish Jadhav

Donald Trump Champagne Sip Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून, त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आयोजित केलेल्या एका भव्य शासकीय मेजवानीदरम्यान ट्रम्प यांनी 'शॅम्पेन'सारख्या दिसणाऱ्या पेयाचा घोट घेतल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. ट्रम्प हे स्वतःला 'टीटोटलर' (मद्यपान न करणारे) मानतात आणि त्यांनी आयुष्यात कधीही दारुला स्पर्श केला नसल्याचा दावा केला. अशा परिस्थितीत, या दुर्मिळ क्षणाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.

नेमकी घटना काय?

राजनैतिक शिष्टाचाराचा भाग म्हणून जेव्हा सर्व पाहुण्यांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तेव्हा ट्रम्प यांच्या एका सहाय्यकाने त्यांना एका ग्लासात पेय दिले. ट्रम्प यांनी तो ग्लास उंचावून उपस्थित पाहुण्यांना अभिवादन केले आणि त्यानंतर त्यातील पेयाचा एक घोट घेतला. ट्रम्प यांच्या या कृतीचा व्हिडिओ समोर येताच, त्यांनी आपले आयुष्यभराचे तत्व मोडले का, अशा चर्चा रंगू लागल्या. ट्रम्प यांच्या ग्लासात नेमके काय होते, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही, परंतु त्यांच्या प्रसिद्ध वैयक्तिक सवयीच्या अगदी उलट ही घटना असल्याने ती हेडलाईन्समध्ये आली.

ट्रम्प मद्यपान का करत नाहीत?

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दारुपासून लांब राहण्यामागे एक अत्यंत दुःखद कौटुंबिक कारण आहे. त्यांचे थोरले बंधू, फ्रेड ट्रम्प ज्युनियर यांचे वयाच्या 42व्या वर्षी अल्कोहोलच्या व्यसनामुळे निधन झाले होते. आपल्या भावाचा हा संघर्ष जवळून पाहिल्यामुळे ट्रम्प यांच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला आणि त्यांनी आयुष्यात कधीही दारु, सिगारेट किंवा अंमली पदार्थांना स्पर्श न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भावाच्या मृत्यूमुळे ट्रम्प यांनी ही शिस्त आयुष्यभर पाळली, म्हणूनच चीनमधील त्या 'शॅम्पेन'च्या घोटाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजनैतिक शिष्टाचार की वैयक्तिक बदल?

या घटनेनंतर इंटरनेटवर दोन प्रकारचे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या मते, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा मान राखण्यासाठी आणि राजनैतिक शिष्टाचार पाळण्यासाठी ट्रम्प यांनी केवळ ओठांना ग्लास लावला असावा. हे वैयक्तिक आवडीसाठी नसून केवळ एक मुत्सद्दी कृती असू शकते.दुसरीकडे, काही लोकांना असे वाटते की ट्रम्प यांनी आपल्या अत्यंत कडक वैयक्तिक तत्त्वाशी तडजोड केली. तरीही, ट्रम्प यांच्या जवळच्या सूत्रांचे असे म्हणणे असते की, अशा प्रसंगी त्यांच्या ग्लासमध्ये अनेकदा 'डाएट कोक' किंवा अल्कोहोल नसलेले द्राक्षाचे ज्यूस दिले जाते. कारण काहीही असले तरी, ट्रम्प यांच्या एका लहानशा घोटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा घडवून आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT