Free Media Protest

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

पोलंडमध्ये 'लोकशाही' धोक्यात! मिडीयाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोक उतरले रस्त्यावर

देशाच्या कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणारे हजारो नागरिक होते. ज्यांना त्यांनी प्रस्थापित करण्यात मदत केलेली लोकशाहीचा (Democracy) आता मृत्यू होत असल्याची चिंता सतावू लागली आहे.

दैनिक गोमन्तक

पोलंडच्या (Poland) उजव्या विचारसरणीच्या सरकारने लक्ष्य केलेल्या यूएस-मालकीच्या टेलिव्हिजन चॅनेलच्या बचावासाठी आणि मीडिया स्वातंत्र्याचे (Free Media) रक्षण करण्यासाठी रविवारी देशभरातील लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांमध्ये अनेक दशकांपूर्वी देशाच्या कम्युनिस्ट राजवटीला विरोध करणारे हजारो नागरिक होते. ज्यांना त्यांनी प्रस्थापित करण्यात मदत केलेली लोकशाहीचा (Democracy) आता मृत्यू होत असल्याची चिंता सतावू लागली आहे.

दरम्यान, बर्‍याच नागरिकांचा असा विश्वास आहे की, पोलंडचे दक्षिणपंथी सरकार देशाला पाश्चात्य सभ्यतेपासून वेगळे करत आहे. देशातील न्यायालयांवर राजकीय नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर माध्यमांना (Free Media) शांत करण्याचा प्रयत्न करुन तुर्की किंवा रशियामधील (Russia) हुकूमशाहीचे मॉडेलचा अंगिकार केला जात आहे. प्रमुख विरोधी पक्षाचे नेते डोनाल्ड टस्क (Donald Tusk) यांनी देशातील नागरिकांना एकता दाखवून नेतृत्व बदलण्याचे आवाहन केले आहे.

लोक विरोध का करत आहेत?

पोलंडच्या सर्वात मोठ्या टेलिव्हिजन नेटवर्क TVN मधील आपला कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी डिस्कव्हरी इंकच्या विरोधात संसदेने शुक्रवारी एक विधेयक मंजूर केले. मात्र पोलिश जनतेकडून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात होत राहण्याचा धोका वाढला आहे. वॉरसॉचे महापौर आणि अध्यक्षपदाचे माजी विरोधी उमेदवार रफाल ट्रझास्कोव्स्की (Rafal Trzaskowski) म्हणाले, 'हे फक्त एका चॅनेलबद्दल नाही.'

लोकांनी मुक्त भाषणाची मागणी केली

ते पुढे म्हणाले, 'एका क्षणात, इंटरनेटची सेन्सॉरशिप म्हणजे माहितीचे सर्व स्वतंत्र स्रोत काढून टाकण्याचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी करु नये अशी माझी इच्छा आहे.' एका चॅनलच्या फुटेजमध्ये आंदोलक पोलिश आणि युरोपियन युनियनचे झेंडे फडकावत आणि 'फ्री मीडिया' चा नारा देत असल्याचे दिसून आले. 71 वर्षीय आंद्रेज लेक यांनीही हातात पोलंड आणि ईयूचा ध्वज धरला होता. ते म्हणाले, 'आम्ही ते स्वीकारु शकत नाहीत. इथे असणं हे माझं कर्तव्य आहे… स्वातंत्र्य धोक्यात असतानाही मी इथेच असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT