Congo Violence Dainik Gomantak
ग्लोबल

Congo Violence: काँगोमध्ये हिंसाचार सुरुच! विस्थापितांच्या छावणीवर बॉम्ब हल्ला; 35 जणांचा मृत्यू

Congo Violence: मागील काही महिन्यांपासून काँगोमध्ये हिंसाचार सुरु आहे. काँगोमधील हिंसाचारात शेजारील देश रवांडाचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे.

Manish Jadhav

Congo Violence: मागील काही महिन्यांपासून काँगोमध्ये हिंसाचार सुरु आहे. काँगोमधील हिंसाचारात शेजारील देश रवांडाचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे. पूर्व काँगोमधील विस्थापित लोकांसाठीच्या दोन छावण्यांवर गेल्या आठवड्यात बॉम्बहल्ला करण्यात आला. आता या बॉम्बहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जवळपास 35 झाली आहे, तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. काँगोच्या उत्तर किवू राज्यातील कॅम्पवर गेल्या आठवड्यात हल्ला झाला होता. स्थानिक नेते एरिक ब्वानापुवा यांनी मृतांच्या संख्येची माहिती दिली आहे, ते म्हणाले की, मृतांचा आकडा वाढू शकतो.

लष्कर आणि बंडखोर एकमेकांवर आरोप करत आहेत

कांगोचे सैन्य आणि बंडखोर गट 'M23' पूर्व काँगोमधील मुगुंगा आणि लॅक व्हर्ट शिबिरांवर झालेल्या बॉम्बस्फोटासाठी एकमेकांवर आरोप करत आहेत. या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 'M23' आणि शेजारी देश रवांडाच्या लष्कराला जबाबदार धरले आहे. M23 हा तुत्सी समुदयाच्या लोकांचा समावेश असलेला सशस्त्र गट आहे. हा गट 12 वर्षांपूर्वी कांगो सैन्यापासून वेगळा झाला.

काय म्हणाले कांगोचे अध्यक्ष?

कांगोचे अध्यक्ष फेलिक्स टी यांनी शेजारील देश रवांडावर ‘एम23’ बंडखोरांना पाठिंबा देऊन काँगोमध्ये अस्थिरता पसरवल्याचा आरोप केला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यासह संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनीही रवांडावर बंडखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे मात्र, रवांडा हे आरोप नाकारतो.

सामान्य जनता त्रस्त आहे

दरम्यान, हा संपूर्ण प्रदेश अशांत आहे, 100 हून अधिक सशस्त्र गट येथे एकमेकांशी लढत आहेत. येथील संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे जमीन आणि मौल्यवान खनिजे असलेल्या खाणींवरचे नियंत्रण. दुसरीकडे, असे देखील गट आहेत जे त्यांच्या समुदायाच्या संरक्षणासाठी लढत आहेत. यातील अनेक गटांवर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोपही आहेत. आतापर्यंत हिंसाचारामुळे सुमारे 7 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT