Vaccination Dainik Gomantak
ग्लोबल

लसीकरण शर्यतीत 'ड्रॅगन' आघाडीवर! वर्षाअखेरीस संपूर्ण लसीकरण होणार पूर्ण

चीन (China) वर्षाच्या अखेरीस आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण (Vaccine) करण्याच्या मार्गावर आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असताना दुसरीकडे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाच्या मोहीमा जगभरात राबविल्या जात आहेत. यातच आता गुरुवारपर्यंत चीनमध्ये (China) कोविड -19 विरुद्ध 88.94 कोटी पूर्ण लसीकरण (Fully Vaccinate) करण्यात आले आहे. देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यांनी मांडलेल्या अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत लोकांना दोन अब्जाहून अधिक लस डोस देण्यात आले आहेत. 19 जून रोजी चीनी सरकारने लोकांना एक अब्ज लस डोस देण्याचा टप्पा गाठला. त्यानंतर, बीजिंगने (Beijing) पुढच्या 10 आठवड्यांत लोकांना एक अब्ज लसीचे डोस दिले आहेत. चीन वर्षाच्या अखेरीस आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण (Vaccine) करण्याच्या मार्गावर आहे.

एनएचसीचे प्रवक्ते मी फेंग (Mi Feng) म्हणाले, चीनमधील 88.94 दशलक्षांहून अधिक लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे (China Fully Vaccinated Population). यापूर्वी शुक्रवारी सांगितले होते की, लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न केले जातील. वैयक्तिक सुरक्षेत कोणत्याही हलगर्जीपणाविरोधात त्यांनी इशारा दिला. नुकत्याच झालेल्या आरोग्य परिषदेत बोलताना चीनचे अव्वल श्वसन तज्ज्ञ झोंग नानशान (Zhong Nanshan) म्हणाले की, देश 2021 च्या अखेरीस आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी 80 टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.

डेल्टाच्या संसर्गाच्या उद्रेकावर चीनने नियंत्रण ठेवले

जुलैनंतर चीनमध्ये लसीकरणाचा वेग वाढला आहे, कारण या काळात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) देशाचे दार पुन्हा एकदा ठोठावले आहे. यामुळे, चीनने गेल्या वर्षापासून कोरोनाच्या उद्रेकाचा सामना करत आहे. सध्या, विषाणूचा उद्रेक नियंत्रणात आला आहे, परंतु अधिकाऱ्यांनी देशाच्या लस मोहिमेची गती कायम ठेवली आहे. चीनचे प्रसिध्द श्वसन तज्ज्ञ झोंग म्हणाले की, जर चीनला हर्ड इम्युनिटी प्राप्त करायची असेल तर लस प्रभावीपणे वापर करावा लागणार आहे.

चीन कोव्हॅक्सच्या माध्यमातून जगाला लसीचे दोन अब्ज डोस देईल

चिनी माध्यमांनी झोंगच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'चीनने तयार केलेली लस 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे, त्यामुळे देशाला 80 टक्के लोकसंख्येला संपूर्णपणे लसीकरण करावे लागेल.' झोंग म्हणाले की चीन 2021 पर्यंत पोहोचण्याची आशा आहे. तज्ञांच्या मते, लोकांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकसंख्येचा मोठा भाग एखाद्या पसरणाऱ्या संसर्ग किंवा रोगापासून मुक्त होतो तेव्हा हर्ड इम्युनिटी निर्माण होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी असेही म्हटले आहे की, बीजिंग कोव्हॅक्सच्या माध्यमातून जगाला दोन अब्ज लस डोस देईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT