Covid-19 Dainik Gomantak
ग्लोबल

Covid 19: युरोपमध्ये 5 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू; WHO ने व्यक्त केली चिंता

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO on Covid-19) ने युरोपमध्ये कोविड-19 संसर्गाची (Corona Pandemic in Europe) वाढती संख्या ही 'गंभीर चिंतेची बाब' असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. यातच आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO on Covid-19) ने युरोपमध्ये कोविड-19 संसर्गाची (Corona Pandemic in Europe) वाढती संख्या ही 'गंभीर चिंतेची बाब' असल्याचे म्हटले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत युरोपमध्ये आणखी 5 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. युरोपियन युनियनची एजन्सी युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (ECDC) नुसार, 4 नोव्हेंबरपर्यंत विविध देशांमधून गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

WHO च्या युरोपियन युनिटचे संचालक हंस क्लुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'युरोपीय क्षेत्रातील 53 देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सध्याचा वेग हा गंभीर चिंतेचा विषय आहे.' संसर्गाचा सध्याचा वेग असाच राहिल्यास पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत येथे कोविड-19 मुळे आणखी पाच लाख मृत्यू होऊ शकतात.

युरोप पुन्हा कोरोना महामारीचे केंद्र बनले

"आम्ही कोरोना महामारीच्या पुनरुत्थानाच्या दुसर्‍या गंभीर टप्प्यावर असल्याचे क्लुगे यांनी कोपनहेगन, डेन्मार्क येथील डब्ल्यूएचओच्या मुख्यालयातील पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आता फरक असा आहे की आरोग्य अधिकार्‍यांना व्हायरसबद्दल चांगलीच माहिती आहे मात्र त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक साधनांचा अभाव आहे.

कोविड प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करणे आणि कमी लसीकरण

क्लुगे म्हणाले की, काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच लसीकरणाचे घटते प्रमाण देखील कोरोनाच्या प्रसाराचे कारण असू शकते. ते पुढे म्हणाले की, 53 देशांमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. हीच गती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या भागात आणखी पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. एका आठवड्यात या प्रदेशात कोरोना संसर्गाची सुमारे 1.8 दशलक्ष नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जी गेल्या आठवड्यापेक्षा सुमारे 6% जास्त आहे. त्याच वेळी, कोविड -19 मुळे 24,000 मृत्यू झाले आहेत, जे गेल्या आठवड्यापेक्षा 12% जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT