Omicron Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये कोरोना धोका वाढला; एका दिवसात नवे 20 हजार रुग्ण

शांघाईमध्ये तीन आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू

दैनिक गोमन्तक

शांघाय : कोरोना संसर्गामुळे संपुर्ण जगाला कमी अधिक प्रमाणात अर्थिक तसेच जीवितहानीला सामोर जावे लागले आहे. सुमारे दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत याचा फटका बसला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या माहितीनुसार चीन मधुन कोरोना फैलाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चीनमधील सद्याची स्थिती काहीशी पुर्वपदावर येत असल्याची स्थिती असताना पुन्हा एकदा चीनला कोरोनाचा फटका बसणार की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Corona threat increased in China )

काल शुक्रवारी चीनमध्ये एकाच दिवसात 20 हजार ओमिक्रॉन बाधित आढले असून या महासाथीच्या आजाराने चीनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामूळे चीनमध्ये कोरोना ओमिक्रॉनच्या संसर्गाची लाट आली आहे. त्यामुळे चीन सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघाईमध्ये तीन आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू केला आहे. तर राजधानी बीजिंगमध्ये 21 दशलक्षांहून अधिक लोकांनी तिसऱ्यांदा न्यूक्लिक अॅसिड चाचणी केली आहे.

चीनमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांत वाढ होत असुन आता बीजिंगमध्ये शनिवारपासून सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी 48 तासांमध्ये केलेली कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. स्थानिक महापालिकेने याबाबतचा निर्णय घेतला आहे. कोरोना चाचणी अहवाल नसल्यास संबंधित नागरिकाला प्रवेश करण्यास मनाई असणार आहे.

तर कोरोना फैलावाबाबत चीनचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते झाओ लिजियन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या आम्हाला ओमिक्रॉनच्या संसर्गाचा सामना करावा लागत आहे. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत आहे. जगातील बहुतेक देशांमधून या व्हेरिएंटचा प्रभाव कमी झाला असताना चीनमध्ये पुन्हा फैलावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT