Kim Jong-un Dainik Gomantak
ग्लोबल

उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा हाहाकार, 2 लाख नागरिक क्वारंटाईन

उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियामध्ये (North Korea) कोरोनाचा (Corona) पहिला रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 5 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात कोरोनाची पुष्टी झालेली नाहीये. राज्य माध्यमांनुसार, सध्या देशातील 1,87,000 लोकांना तापाची लक्षणे जाणवत आहेत, ज्यामुळे त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. (Corona havoc in North Korea 2 million citizens quarantined)

8 मे रोजी उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि गुरुवारी याची पुष्टी झाली यासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, उत्तर कोरियाने 2020 च्या अखेरीस 13,259 लोकांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. तर त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

देशाच्या KCNA वृत्तसंस्थेनुसार, राजधानी प्योंगयांगमध्ये एप्रिलच्या शेवटी, लोक अचानक तापाची शिकार होऊ लागले आणि हा ताप प्योंगयांगच्या बाहेर पसरला. आतापर्यंत एकूण 3,50,000 लोकांमध्ये या तापाची लक्षणे दिसून आली. तसेच यापैकी किती लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत हे एजन्सीने उघड केलेले नाहीये.

यावेळी उत्तर कोरियामधील कोरोनावरून नियम किती कडक असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, देशात राहणार्‍या 25 दशलक्ष लोकांचे जीवन धोक्यात आले, कारण येथे कोणालाही लस दिली जाणार नाही, तसेच त्यांना चांगल्या प्रतीच्या आरोग्य सुविधाही मिळणार नाहीत. येथे पसरणारा ताप हा कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron Variant) प्रकार आहे.

उत्तर कोरियाने ब्रिटन आणि चीनसारख्या देशांमध्ये बनवलेली लस खरेदी करण्यास स्पष्ट नकार दर्शवला. त्याऐवजी, सरकारने सांगितले की त्यांनी जानेवारी 2020 मध्ये सर्व सीमा बंद करून कोरोनाला देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आली आहे.

उत्तर कोरियाला खरा धोका कोरोनाचा नसून लॉकडाऊनचाच आहे. लोकसंख्येचा मोठा भाग देखील कुपोषणाने त्रस्त आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीमा बंद झाल्यामुळे व्यापार कमी झाला आहे. आता लॉकडाऊन लागू झाल्याने अन्न आणि औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर कोरियामध्ये लॉकडाऊन किती कडक असू शकतो याची सध्या आम्हाला कल्पना नाहीये. हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) आपली खरी परिस्थिती सांगून जगाला मदत घेण्याचे संकेत देत असावेत.

गुरुवारी किम जोंग यांनी पहिल्यांदा कोरोनावर झालेल्या बैठकीत मास्क घातला होता. देशातील विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी, जास्तीत जास्त आपत्कालीन आदेश दिले गेले आहेत, ज्यात कामाच्या ठिकाणी गर्दी न करणे आणि स्थानिक लॉकडाऊन यांसारख्या प्रोटोकॉलचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT