चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे 'सेरेब्रल एन्युरिझम' नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना 2021 च्या अखेरीस रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. पुढे असेही म्हटले जात आहे की, त्यांनी शस्त्रक्रियेसाठी जाण्याऐवजी पारंपारिक चीनी औषधाने उपचार करणे पसंत केले आहे. (Chinese President Xi Jinping is suffering from a disease called a cerebral aneurysm)
दरम्यान, शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अटकळ बांधल्या जात होत्या. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्यांनी परदेशी नेत्यांना भेटणे टाळले होते. यापूर्वीच मार्च 2019 मध्ये शी जिनपिंग यांच्या इटली (Italy) दौऱ्यात त्यांच्या चालण्याच्या शैलीत बदल झाला होता, ते लंगडताना दिसले होते. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2020 मध्ये शेन्झेनमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांच्या उपस्थितीत झालेला उशीर, संथ बोलणे आणि खोकला यामुळे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल पुन्हा अटकळ निर्माण झाली होती.
सेरेब्रल एन्युरिझम म्हणजे काय?
सेरेब्रल एन्युरिझम किंवा इंट्राक्रॅनियल एन्युरिझम हा मेंदूचा (Brain) एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. हा आजार मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या पेशी कमकुवत झाल्यामुळे होतो. जर हा आजार वाढल्यास रक्तवाहिन्या फुटतात. या प्रकारच्या रक्तस्त्रावामुळे स्ट्रोक, कोमा/किंवा मृत्यू होऊ शकतो. सेरेब्रल एन्युरिझमची अनेक लक्षणे आहेत जसे की, डोकेदुखी, डोळ्यात दुखणे, डोळ्यांची दृष्टी बदलणे इ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.