Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

G-20 Summit: चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार नाहीत, चीनी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं कोण येणार G -20 साठी...

G-20 Summit New Delhi News: G-20 ची शिखर परिषद नवी दिल्लीत होणार आहे. तत्पू्र्वीचं एक मोठी अपडेट समोर येत आहे.

Manish Jadhav

G-20 Summit New Delhi News: G-20 ची शिखर परिषद नवी दिल्लीत होणार आहे. तत्पू्र्वीचं एक मोठी अपडेट समोर येत आहे. चीनने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.

पंतप्रधान ली केकियांग या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार्‍या 18 व्या G20 शिखर परिषदेला ली केकियांग भारत सरकारच्या निमंत्रणावरुन उपस्थित राहतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी एका संक्षिप्त निवेदनात सांगितले.

पीटीआय नुसार, प्रवक्ते माओ म्हणाले की, चीनला आशा आहे की शिखर परिषद एकमत मजबूत करेल, विश्वास व्यक्त करेल आणि विकासाला चालना देईल.

दरम्यान, G20 चे अध्यक्ष म्हणून भारत 9-10 सप्टेंबर रोजी या प्रभावशाली गटाच्या वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यात अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह दोन डझनहून अधिक जागतिक नेते सहभागी होणार आहेत.

बायडन यांनी निराशा व्यक्त केली

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. बायडन म्हणाले की, 'ते या आठवड्यात भारत यात्रेसाठी उत्सुक आहेत, परंतु चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत याबद्दल ते निराश आहेत.'

व्हाईट हाऊसने गेल्या शुक्रवारी जाहीर केले होते की, जी 20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बायडन 7 सप्टेंबर रोजी भारताला भेट देतील आणि 8 सप्टेंबर रोजी ते ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील.

दौऱ्यापूर्वी, पत्रकारांनी रविवारी बायडन यांना विचारले की, ते भारत आणि व्हिएतनामच्या दौऱ्यासाठी उत्सुक आहेत का? प्रत्युत्तरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "होय, मी तयार आहे."

G20 गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन (China), फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) ) समाविष्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT