Singapore Crime
Singapore Crime Dainik Gomantak
ग्लोबल

Singapore Crime: चिनी नागरिकाकडून भारतीयाची हत्या; सिंगापूर कोर्टाने सुनावली जन्मठेपेसह 12 फटके मारण्याची शिक्षा!

Manish Jadhav

Singapore Crime: सिंगापूरमध्ये एका चिनी नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या केली होती. आता भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी येथील न्यायालयाने (Court) चिनी वंशाच्या सिंगापूरच्या (Singapore) नागरिकाला दोषी ठरवून जन्मठेप आणि 12 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. 2019 मध्ये एका नाइटक्लबबाहेर झालेल्या भांडणात चिनी वंशाच्या नागरिकाने भारतीय वंशाच्या नागरिकाची (Indian Origin Citizen) हत्या केली होती.

ही घटना एका क्लबबाहेर घडली

टेलिव्हिजन वृत्तवाहिनी न्यूज एशियाने वृत्त दिले आहे की, फिर्यादीने फाशीची शिक्षेची मागणी केली नव्हती. सिंगापूरमध्ये (Singapore) खुनाच्या गुन्ह्यात मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. ही घटना 2 जुलै 2019 रोजी ऑर्चर्ड रोड येथील टुरिस्ट हब परिसरातील हॉटेल आणि नॉटी गर्ल क्लबच्या बाहेर घडली होती.

चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू

दरम्यान, दोषी टॅन सेन यांग (32) याला जुलै 2019 मध्ये क्लबबाहेर झालेल्या भांडणात 31 वर्षीय सतीश नोएल गोबिदास (Satish Noel Gobidas) याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. टॅनसह सात जणांवर सुरुवातीला समान हेतूने हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. चाकू हल्ल्यात सतीशचा मृत्यू झाला होता.

भारतीय वंशाच्या व्यक्तीला 20 वर्षांची शिक्षा सुनावली

भारतीय वंशाच्या एका विवाहित व्यक्तीला अलीकडेच सिंगापूरमध्ये निर्दोष हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने (Court) त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपीने आपल्या प्रेमिकेचे इतर पुरुषांशी संबंध असल्याच्या रागातून तिला ढकलून दिले होते, यामध्ये तिचा मृत्यू झाला. एम कृष्णन असे दोषी व्यक्तीचे नाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honeytrap Case: INS हंसा दाबोळीचे फोटो पाकिस्तानला शेअर केल्याचा संशय, मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याची कसून चौकशी

Panaji Murder Case : मालगाडीत झोपले अन् कर्नाटकात पोचले; मराठे खून प्रकरणातील संशयितांचा सिनेस्टाईल प्रवास

Karnataka: 'ते हिंदूंचा द्वेष करतात', काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट करणाऱ्या 'मुंबईच्या डॉन'ला गोव्यातून अटक

Goa Today's Live News: कुर्टी-फोंड्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, नऊ लाखांचे नुकसान

Bicholim News : चित्रकारांना पाठिंबा द्या : चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT