China Taliban Deal Dainik Gomantak
ग्लोबल

China Taliban Oil Deal: '...पाकिस्ताननंतर चीनच्या जाळ्यात अफगाणिस्तान', तालिबानबरोबर केला करार!

China Taliban Oil Deal: अफगाणिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

China Taliban Oil Deal: अफगाणिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच, तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानने चिनी कंपनीसोबत पहिला आंतरराष्ट्रीय करार केला आहे. या संदर्भात, तालिबान राजवटीने उत्तर अमू दर्या खोऱ्यातून तेल काढण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय करार केला आहे.

आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी

अफगाणिस्तानला (Afghanistan) आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी तालिबानने एका चिनी कंपनीसोबत करार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशाला मोठ्याप्रमाणात महसूल मिळेल. मात्र, या राजवटीला चीनने अद्याप मान्यता दिलेली नाही.

तसेच, या कार्यक्रमात काबूल, अफगाणिस्तानमधील चीनचे राजदूत वांग यू आणि तालिबानचे (Taliban) आर्थिक घडामोडींचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर, चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या उपकंपनीसोबत झालेल्या करारावर उपस्थित होते. दोघांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वाक्षरी केली.

तालिबान काय म्हणाले

तालिबानच्या आर्थिक घडामोडींचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय करारावर सांगितले की, "या करारामुळे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत होईल." दुसरीकडे मात्र, चीनने अद्याप तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. ते पुढे म्हणाले की, 'हा 25 वर्षांचा करार अफगाणिस्तानला स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नात मदत करेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

Birch By Romeo Lane Fire: 25 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख! ‘बर्च’ अग्निकांडात लुथरा बंधूंचा उच्च न्यायालयात भरपाईचा मोठा प्रस्ताव

Goa SIR Voter Deletion: 'सॉफ्टवेअरची चूक, शिक्षा मतदारांना का?'; निवडणूक आयोगाची गोवा खंडपीठाकडून झाडाझडती

Horoscope: पैसा, नोकरी आणि यश! गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार खास, मिळू शकतो आर्थिक लाभ अन् प्रगतीचा योग

SCROLL FOR NEXT