Chinese Companies three child policy  Dainik Gomantak
ग्लोबल

चिनी कंपन्यांची ऑफर - तिसर्‍या मुलाला जन्म द्या, 1 वर्षाची रजा, 11.50 लाख बोनस घ्या

चीनमधील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1980 मध्ये 'एक मूल धोरण' लागू करण्यात आले होते

दैनिक गोमन्तक

बीजिंग: अनेक चीनी कंपन्या (Chinese Companies) कर्मचाऱ्यांसाठी आश्चर्यकारक ऑफर देत आहेत. यानुसार जे कर्मचारी तिसर्‍या मुलाला जन्म देतील, त्यांना एक वर्षाची रजा मिळणार आहे. यासोबतच सुमारे 11.50 लाख रुपये (90,000 चीनी युआन) बक्षीसही दिले जाणार आहे. अलीकडील अहवाल सूचित करतात की बीजिंगच्या डबेनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रुपने (Dabeinong Technology Group) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. यानुसार तिसऱ्या अपत्यावर 90,000 युआन रोख बोनस दिला जाणार आहे. याशिवाय कंपनीकडून महिला कर्मचाऱ्यांना 1 वर्ष आणि पुरुष कर्मचाऱ्यांना 9 महिन्यांची रजा दिली जाणार आहे. याशिवाय, कर्मचाऱ्याला दुसरे अपत्य असल्यास, त्याला अजूनही 60,000 युआनचा रोख बोनस मिळेल. म्हणजेच सुमारे 7 लाख रुपये. त्याच वेळी, पहिल्या मुलावर 30,000 युआन म्हणजे सुमारे 3.50 लाख रुपयांचा रोख बोनस दिला जाईल. (One Child Policy in China)

माहितीनुसार 3 मुलांशी संबंधित सरकारच्या धोरणाचे समर्थन करत कंपनीने अशी योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1980 मध्ये 'वन चाइल्ड पॉलिसी' लागू करण्यात आली होती. मात्र हे धोरण सुमारे 40-45 वर्षे लागू झाल्यानंतर देशातील वृद्धांची संख्या वाढू लागली. यासंबंधीच्या इतर समस्याही समोर येऊ लागल्या. यानंतर सरकारने 2016 मध्ये 'वन चाइल्ड पॉलिसी' (One Child Policy) रद्द केली होती.

मात्र चिनी सरकारने नवीन धोरण लागू केल्यानंतरही, चीनच्या तरुण लोकसंख्येच्या अधिक मुले जन्माला घालण्याकडे विशेष कल दिसून आलेला नाही. त्यामुळेच आता कॉर्पोरेट जगतही पुढे आले आहे. अनेक कंपन्यांनी 2021 पासून 'थ्री चाइल्ड पॉलिसी' अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT