Shoxi Y-8 Dainik Gomantak
ग्लोबल

चीनची तैवानमध्ये पुन्हा घुसखोरी

तैवानच्या संरक्षण पर्यवेक्षणानुसार एक चीनी सैन्य विमान रविवारी दुपारच्यावेळी तैवानच्या वायु क्षेत्रामध्ये (एडीआयझेड) (A.D.I.Z) मध्ये घुसले आहे.

दैनिक गोमन्तक

चीन (China) ने पुन्हा एकदा तैवानमध्ये (Taiwan) घुसखोरी केली आहे. तैवानच्या संरक्षण पर्यवेक्षणानुसार एक चीनी सैन्य विमान रविवारी दुपारच्यावेळी तैवानच्या वायु क्षेत्रामध्ये (एडीआयझेड) (A.D.I.Z) मध्ये घुसले आहे. या महिन्यातील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People's Liberation Army) एयर फोर्सची तैवानमध्ये 12 वी घुसखोरी आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने घोषणा केली की, रविवारी एडीआजेडच्या दक्षिण-पश्चिमी क्षेत्रामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एयर फोर्स (पीएलएएफ) 'शॉक्सी वाई -8' (Shoxi Y-8) 'पनडुब्बी रोधी युद्ध विमानाला ट्रॅक करण्यात आले आहे. उत्तरादाखल तैवानने आपल्या विमान पाठवले आणि रेडिओवरुन चेतावणी देणारा संदेश प्रकाशित केला.

दरम्यान, चीनी विमानाला ट्रॅक करण्यासाठी तैवान ने वायु संरक्षण मिसाईलची व्यवस्था तैनात केली. आणि त्यात पनडुब्बीचे रोधी युद्ध, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि टोही संस्करणाचा समावेश आहे. मागील वर्षांतील सप्टेंबर नंतर बीजिंग नियमितपणे तैवानच्या एडीआयएजेड क्षेत्रामध्ये विमानांना पाठवून आपले ग्रे-जोन रणनीतीचा वापर करत आहे. बहुतेक वेळा जोनच्या दक्षिण-पश्चिमेचे क्षेत्र आणि सामान्यत: एक ते तीन कमी गतीने उडणारे टर्बोप्रॉप विमान आहे.

चीन तैवानला आपल्याच प्रदेशाचा भाग असल्याचा दावा करतो. तैपईने अमेरिकेबरोबर सामरिक संबंध विकसीत केल्यापासून चीनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे चीन तैवान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संबंधाचा क्षणोक्षणी विरोध करत आला आहे. चीनने धमकी दिली आहे की, 'तैवानची आजादी' म्हणजे युद्ध.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT