China ready to send civilian to space  Dainik Gomantak
ग्लोबल

China Space Mission: चीन उद्या करणार धमाका; सामान्य नागरिकांना पाठवणार अंतराळात

आतापर्यंत केवळ लष्कराच्याच अंतराळवीरांना अवकाशात पाठवले गेले होते

Akshay Nirmale

China ready to send civilian to space: चीनचे कम्युनिस्ट सरकार प्रथमच एका सामान्य अंतराळवीराला अवकाशात पाठवण्याच्या तयारीत आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी ९.३१ वाजता जिउगुआन उपग्रह केंद्रातून चीन प्रक्षेपित करेल. यापूर्वी चीनमधून केवळ लष्करी अंतराळवीर अवकाशात गेले आहेत.

चीनच्या अंतराळ संस्थेने सोमवारी याबाबत माहिती दिली. बीजिंगच्या युनिव्हर्सिटी ऑफ एरोनॉटिक्स अँड अॅस्ट्रोनॉटिक्सचे प्रोफेसर गुई यांची या मिशनवर जाण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले.

त्याच वेळी, मिशनचे कमांडर जिंग हायपेंग असतील. ते पीपल्स लिबरेशन आर्मीचे आहेत. या मिशनमध्ये दोघांशिवाय एक अभियंता झू यांगझू देखील असेल.

2030 पर्यंत चंद्रावर पोहोचण्याची चीनची योजना

चीन 2030 पर्यंत चंद्रावर पोहोचण्याची तयारी करत आहे. यासाठी चिनी सैन्याच्या अंतराळ कार्यक्रमावर अनेक अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी चीनने तिसरे कायमस्वरूपी अंतराळ स्थानक बांधण्याचे काम पूर्ण केले होते. ज्याचे नाव तिआंगॉन्ग आहे.

प्रक्षेपणानंतर ते 10 वर्षे पृथ्वीच्या कक्षेत ठेवले जाईल. त्यामुळे मानवाचा अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम होणार आहे. 2011 मध्ये अमेरिकेने नासाला चीनच्या अंतराळ संस्थेसोबत काम करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून चीन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर आहे.

चीन चंद्राचा काही भाग काबीज करू शकतो

नासाचे अधिकारी बिल नेल्सन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, चीन चंद्राच्या एका भागावर वैज्ञानिक संशोधन सुविधा उभारत आहे. चीन नंतर या भागावर कब्जा करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेला भीती आहे की जर चीन सर्व मोहिमांमध्ये यशस्वी झाला तर तो अमेरिकेला अंतराळ शर्यतीत मागे सोडेल. याशिवाय चीन अंतराळात आपले लष्करी तळ उभारेल, अशी भीती अमेरिकेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT