Chinese Drill In South China Sea: दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. चीनची लढाऊ विमाने आपल्या हद्दीत घुसल्याचा दावा तैवानने केला आहे. तैवानने 42 लढाऊ विमानांच्या घुसखोरीचा दावा केला आहे.
चीनच्या या घुसखोरीने तैवानच्या अडचणीत वाढ झाली आहे. चीनने तैवानविरुद्ध प्लॅन बी वर काम सुरु केल्याचे बोलले जात आहे. 42 चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली. यावेळी चीन पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात चीन (China) आणि तैवान आमने-सामने आहेत. चीन सतत तैवानवर हल्ला करण्याची धमकी देत आहे. तैवानला चिथावणी देण्यासाठी चीनने वेळोवेळी लष्करी युद्धाभ्यासही केले आहेत.
तैवानच्या म्हणण्यानुसार, चीनच्या 42 लढाऊ विमानांनी त्यांच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. चला तर मग आता जाणून घ्या, असे काय घडले, ज्यामुळे चीन तैवानवर चिडला आहे.
वास्तविक, चीनच्या संतापाचे कारण म्हणजे तैवानचे उपराष्ट्रपती विलियम लाई यांचा अमेरिका दौरा. पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या निवडणुकीत तैवानचे पुढील राष्ट्रपती होण्यासाठी विलियम लाई या प्रबळ दावेदार असून त्यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी चीनवर जोरदार टीका केली.
विलियम लाई यांची अमेरिका भेट आणि त्यांच्या भाषणामुळे चीन इतका संतप्त झाला आहे की, तैवानला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच दिली. तैवानच्या सीमेवर जमीन, आकाश आणि समुद्रात चीन सातत्याने युद्धाभ्यास करत आहे.
दुसरीकडे, तैवान (Taiwan) चीनच्या चिथावणीला बळी न पडता आपल्या मिशनवर काम करत आहे. जे मिशन चीनसाठी मोठा धोका आहे. खरे तर, तैवान असे शस्त्र तयार करत आहे जे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकते आणि गरज पडल्यास प्राणघातक हल्लेही करु शकते.
दरम्यान, तैवानचे हे घातक शस्त्र पोर्टेबल ड्रोन अल्बट्रॉस II आहे, जे चीनसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान तैवानने नुकतेच जगासमोर आणले आहे.
तैवान गेल्या काही वर्षांपासून हेच शस्त्र तयार करत आहे. हे मानवरहित पोर्टेबल ड्रोन युक्रेनने रशियाविरुद्ध वापरलेल्या अमेरिकन ड्रोनसारखेच आहे. तैवान या ड्रोनच्या मदतीने चीनवर हल्ला करु शकतो. वास्तविक, तैवानचे आखात खूपच अरुंद आहे.
तैवानमध्ये एन्ट्री करण्यासाठी चीनला ही अरुंद खाडी पार करावी लागेल. किनाऱ्यावर आणि खाडीच्या मध्यभागी मोठ्या संख्येने जहाजे जमा होतील.
जेव्हा युद्धनौका एवढ्या मोठ्या प्रमाणात फिरतील तेव्हा त्यांचा वेग कमी होईल आणि याचाच फायदा घेऊन तैवानचे ड्रोन चिनी युद्धनौका आणि शस्त्रास्त्रांना सहज लक्ष्य करु शकतील.
दुसरीकडे, तैवानचे पोर्टेबल ड्रोन अल्बाट्रोस II चीनचा हल्ला सहजपणे परतवून लावू शकते. तैवानची भौगोलिक रचना अंडाकृती असून 300 किमी लांबीचे घनदाट जंगल असलेले पर्वत आहेत. धोकादायक क्षेत्रे आहेत.
तैवान अल्बट्रोस II ड्रोनच्या मदतीने चीनवर हल्ला करु शकतो. तैवान या ड्रोनच्या मदतीने चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकतो आणि त्याच्या प्रत्येक हालचालीला उत्तरही देऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.