China-Australia Dainik Gomantak
ग्लोबल

China-Australia: चीनच्या आठमुठेपणामुळे ऑस्ट्रेलियाचे नौसेनिक झाले जखमी

China-Australia: ऑस्ट्रेलियन सरकारने चीन सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

China-Australia: चीन आपल्या कारवायांमुळे सातत्याने चर्चेत राहणारा देश आहे. इतर देशांच्या अधिकारात येणारी जमीन, साधने यांच्यावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने होत असतो. यामुळेच चीन शेजारील राष्ट्रे अशा कारवायांमुळे त्रासली आहेत. आता चीनच्या युद्धनौकेमुळे ऑस्ट्रेलियाच्या गोतेखोर जखमी झाल्याची माहीती समोर आले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, ऑस्ट्रेलियन युद्धनौकेच्या प्रोपेलरमधून मासेमारीची जाळी साफ करण्यासाठी नौदलाचे गोताखोर खाली उतरले होते. त्यानंतर चिनी युद्धनौकेने आपली हुल-माउंट सोनार सुरू केली. संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियन युद्धनौकेने या भागात उपस्थित जहाजांना अनेक इशारे दिले होते की डायव्हिंग ऑपरेशन सुरू आहे. " टूवूम्बाने संवादाची कबुली दिल्यानंतरही चिनचे जहाज जवळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेव्हा हहुल-माउंटेड सोनार ऑस्ट्रेलियन डायव्हर्सना धोका निर्माण करेल अशा प्रकारे चालवले जात आहे, याची जाणीव झाली तेव्हा नौसैनिकांना पाण्यातून बाहेर काढण्यास भाग पाडले गेले.

सोनार पल्समुळे डायव्हर्सच्या कानाला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने चीन सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांच्या मते ही घटना असुरक्षित आणि अव्यावसायिक आहे. ते म्हणतात की एडीएफ जहाजे अनेक दशकांपासून या प्रदेशात सागरी पाळत ठेवत आहेत. हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार केले जाते. युद्धनौका आंतरराष्ट्रीय पाण्यात होती, पण तो भाग जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातही येतो.

ऑस्ट्रेलियन जहाज जपानच्या दिशेने बंदरात जात होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या चीन दौऱ्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे. सात वर्षांत चीनला भेट देणारे अल्बानीज हे पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी चर्चा झाली. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन आणि शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली आहे.

दरम्यान, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत या चार देशांनी मिळून इंडो-पॅसिफिक भागात विकास करण्यासाठी क्वाड ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. मात्र चीनला कोडींत पकडण्यासाठी क्वाड ग्रुप काम करत असल्याचा आरोप अनेकदा चीनने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT