Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter विकत घेताच एलन मस्क अ‍ॅक्शन मोडमध्ये, CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

Twitter: यूएस मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना एलन मस्क यांनी पदावरून हटवले आहे.

दैनिक गोमन्तक

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क (Elon Musk) हे ट्विटरचे बॉस बनले आहेत. इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये प्लॅटफॉर्मचे प्रमुख असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, आता इलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवल्याची बातमी आहे.

यूएस मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही काढून टाकण्यात आले आहे. परागसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सीएफओ नेड सेगल यांचाही समावेश आहे. वास्तविक, 13 एप्रिल रोजी एलन मस्कने ट्विटर खरेदीची घोषणा केली. त्यांनी $54.2 प्रति शेअर या दराने $44 बिलियनला हा प्लॅटफॉर्म विकत घेण्याची ऑफर दिली होती.

त्यादरम्यान, त्यांचा करार थांबला होता. ज्यानंतर एलन मस्कने 8 जुलै रोजी डील संपवण्याचा निर्णय घेतला, परंतु या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी डील पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. एलन मस्क गुरुवारी ट्विटरच्या ऑफिसमध्ये दिसले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल झाला.

त्याचवेळी, यूएस मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal), सीएफओ नेड सेगल, लीगल अफेअर-पॉलिसी हेड विजया गड्डे यांच्यासह त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. अशीही बातमी आहे की, इलॉन मस्कचा ट्विटरसोबतचा (Twitter) करार पूर्ण होत असताना पराग अग्रवाल आणि नेड सेगल ऑफिसमध्ये होते, त्यानंतर त्यांना ऑफिसमधून हाकलून देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT