Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar Dainik Gomantak
ग्लोबल

Hardeep Singh Nijjar Case: ''दहशतवादी निज्जर हत्या प्रकरणात भारत मदत करतोय...'', कॅनडाचे NSA जोडी थॉमस यांचं वक्तव्य

India Canada Relations: हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते.

Manish Jadhav

India Canada Relations: हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. त्यानंतर भारतानेही हे आरोप फेटाळून लावत कॅनाडावर निशाणा साधला होता. यातच आता, कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जोडी थॉमस यांनी शनिवारी सांगितले की, निज्जर हत्या प्रकरणाच्या तपासात भारताकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. एका मुलाखतीत थॉमस म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध सुधारले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांसोबतच्या गेल्या काही बैठका फलदायी ठरल्या आहेत.

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारत सरकारवर आरोप

परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबरमध्ये म्हटले होते की, निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो. भारत सरकारच्या एजंटनी निज्जरची हत्या केली असे मानण्याचे कारण कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांकडे आहे, असे ट्रूडो म्हणाले होते. निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असण्याची शक्यता कॅनडाच्या एजन्सी तपासत आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये कोणताही सहभाग अस्वीकार्य आहे, यावर ट्रूडो यांनी जोर दिला होता.

पंतप्रधानांनी संसदेत हे वक्तव्य केले होते

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत सांगितले होते की, नवी दिल्ली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो होतो. यावेळी मी त्यांना सांगितले होते की, या हत्याकांडाच्या तपासात भारत सरकारचा कोणताही सहभाग अस्वीकार्य असेल. मी त्यांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली होती. कॅनडाच्या भूमीवर एका कॅनडियन नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. कोणत्याही परकीय सरकारचा हत्येमध्ये सहभाग असणे हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. त्यांचे सरकार स्वतः कॅनडाच्या एजन्सीसोबत काम करत आहे. सरकार आणि यंत्रणांमध्ये समन्वय आहे.

कोण होता हरदीप सिंग निज्जर?

बंदी घातलेल्या भारतीय फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित निज्जर याने गुरपतवंत सिंग पन्नू याच्यानंतर संघटनेचा पदभार स्वीकारला होता.

पंजाब पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, तो जालंधरमधील भारसिंग पुरा गावचा रहिवासी होता आणि 1996 मध्ये तो कॅनडामध्ये स्थलांतरित झाला होता.

कॅनडामध्ये, त्याने प्लंबर म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण, गेल्या काही वर्षांत, खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये त्याच्या सहभागामुळे त्याच्या संपत्तीत अचानक वाढ झाली.

निज्जरचा दहशतवादात सहभाग जगतार सिंग तारा याच्या नेतृत्वाखालील बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या सदस्यत्वापासून सुरू झाला. त्यानंतर त्याने खलिस्तान टायगर फोर्स (KTF) हा स्वतःचा गट स्थापन केला. त्याच्यावर भारतातील खलिस्तानी सेलची ओळख पटवणे, प्रशिक्षण देणे आणि निधी पुरवण्याचे आरोप आहेत आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

2014 मध्ये निज्जरने आध्यात्मिक नेते बाबा भनियारा यांच्या हत्येचा कट रचला होता. 2015 मध्ये, मनदीपसिंग धालीवाल यांना सूचना देण्यासाठी त्याने कॅनडामध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, ज्यांना नंतर मिशनसह पंजाबला पाठवण्यात आले होते. मनदीपला जून 2016 मध्ये अटक करण्यात आली होती.

नोव्हेंबर 2020 मध्ये, निज्जरने परदेशात राहणारा सहकारी गँगस्टर अर्श डल्ला याच्याशी युती केली. या व्यतिरिक्त, तो डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मनोहर लाल यांच्या हत्येमध्ये सहभागी होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही! कुठ्ठाळी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

SCROLL FOR NEXT