Canada School Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Canada School Shooting: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टंबलर रिज या छोट्या शहरात एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण देश हादरला.

Manish Jadhav

Canada School Shooting: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टंबलर रिज या छोट्या शहरात एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण देश हादरला. टंबलर रिज सेकंडरी स्कूलमध्ये मंगळवारी (10 फेब्रुवारी) दुपारी एका माथेफिरुने केलेल्या बेछूट गोळीबारात संशयित हल्लेखोरासह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले.

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साधारण 1:20 वाजता शाळेत एक 'ॲक्टिव्ह शूटर' असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शाळेचा ताबा मिळवण्यासाठी शोधमोहीम सुरु केली.

शाळेच्या आत शोध घेत असताना पोलिसांना अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या शोधमोहीमेत संशयित हल्लेखोराचा मृतदेह देखील शाळेच्या इमारतीतच सापडला. प्राथमिक अंदाजानुसार, हल्लेखोराने इतरांवर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असे पोलिसांनी सांगितले.

दुर्दैवाने, शाळेच्या (School) आत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एका पीडिताने रुग्णालयात नेताना वाटेतच प्राण सोडले. या घटनेची भीषणता इतकी मोठी होती की, दोन गंभीर जखमींना एअर ॲम्बुलन्सच्या सहाय्याने तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. शाळेतील गोळीबाराशी संबंधित असलेल्या एका घरात पोलिसांना आणखी दोन मृतदेह आढळले. यामुळे मृतांचा एकूण आकडा 10 वर पोहोचला. या घटनेनंतर परिसरात कमालीची भीती पसरली असून रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सायंकाळी 5:45 नंतर 'इमर्जन्सी अलर्ट' हटवण्यात आला. सध्या कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शाळेतील इतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना सुखरुप बाहेर काढून त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी भेटवून देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे टंबलर रिज शहरात शोककळा पसरली असून कॅनडातील शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी (Police) अद्याप हल्लेखोराची ओळख आणि त्याच्या कृत्यामागचा नेमका हेतू जाहीर केलेला नाही. या घटनेचा सखोल तपास सुरु असून, पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim: बंदूक साफ करायला गेला, अचानक दाबला गेला ट्रिगर; गोळी लागून बोरीतील व्यक्ती गंभीर जखमी

Om Birla Abuse: लोकसभा अध्यक्षांच्या दालनात घुसून शिवीगाळ! किरेन रिजीजूंचा काँग्रेस खासदारांवर खळबळजनक आरोप

Mopa Racing Festival: 14, 15 फेब्रुवारी रोजी रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिवल'! 100 हून अधिक वाहतूक पोलिस ठेवणार नियंत्रण

Plane Crash Landing: पंख तुटले, हाहाकार उडाला..! समुद्रात विमानाचं क्रॅश लँडिंग, 55 प्रवाशांसाठी वैमानिक ठरला 'देवदूत' VIDEO

Goa Sexual Assault Case: बाबूश मोन्सेरात यांची 9 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; 2016 च्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

SCROLL FOR NEXT