Canada India Tension Dainik Gomantak
ग्लोबल

Canada India Tension: कॅनडा किंवा भारत यापैकी जर एकाला निवडायचे असेल तर अमेरिका नक्कीच 'या' देशासोबत असेल...

पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांची स्पष्टता

Kavya Powar

Canada India Tension: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

याबाबत युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे (पेंटागॉन) माजी अधिकारी मायकेल रुबिन म्हणाले की, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या या आरोपांमुळे भारतापेक्षा कॅनडालाच जास्त धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे जर अमेरिकेला ओटावा आणि नवी दिल्ली यापैकी एकाची निवड करायची वेळ आली तर ते निश्चितपणे भारताची निवड करतील. कारण हे संबंध देशासाठी खूप महत्वाचे आहेत.

याबाबत रुबिन पुढे म्हणाले की, भारत कॅनडाच्या तुलनेत खूप महत्त्वाचा देश आहे आणि ओटावाने भारताशी लढा देणे म्हणजे 'मुंगीने हत्तीशी लढा देण्या'सारखे आहे.

दुसरीकडे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याबद्दलचे खराब मत पाहता, त्यांचे पंतप्रधानपद फार काळ टिकणार नाही असे दिसते. त्यामुळे जेव्हा ट्रुडो पदावरून जातील, तेव्हा अमेरिका कॅनडाशी नव्याने संबंध निर्माण करण्याचा विचार करेल.

इथे पहा व्हिडिओ

याबाबत बोलताना रुबिन यांनी जस्टिन ट्रुडोंवर परखड शब्दात निशाणा साधला. ते म्हणाले की, भारतावर हे असे आरोप करून ट्रुडोंंनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी कोणताही पुढील विचार न करता अशी विधाने केल्याचे दिसते. कारण त्यांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही. त्यामुळे भारत दहशतवाद्याला आश्रय का देईल, हे जस्टिन ट्रुडोंंनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

कॅनडाच्या सरी येथे गुरुद्वाराबाहेर पार्किंग एरियामध्ये 18 जूनला दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावरून दोन्ही देशातील वातावरण चांगलेच तापले.

कॅनडा आणि भारत यापैकी एकाला निवडण्यामुळे अमेरिका अडचणीत सापडले आहे. पण जर आम्हाला कुणा एकाला निवडायचेच असेल तर आम्ही भारताला निवडू. कारण भारताशी असलेले संबंध आमच्यासाठी महत्वाचे आहेत. निज्जर हा दहशतवादी होता, त्यामुळे या प्रकरणात आम्ही भारताच्या बाजूने आहोत, असे रुबिन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT