Cambodia Casino Fire VIDEO Dainik Gomantak
ग्लोबल

Cambodia Casino Fire VIDEO: कंबोडियातील कॅसिनोला भीषण आग, दहा जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Cambodia Casino Fire: कंबोडियातील हॉटेलला लागलेल्या आगीचा व्हिडिओ पाहून आगांवर काटा उभा राहिल

दैनिक गोमन्तक

कंबोडियातील एका हॉटेल कॅसिनोला लागलेल्या आगीत सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने कंबोडियन पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, थायलंडच्या सीमेवर असलेल्या कंबोडियन हॉटेल-कसिनोमध्ये ही दुःखद घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पोईपेट येथील ग्रँड डायमंड सिटी हॉटेलला आग लागली. आगीच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये लोक हॉटेलच्या इमारतीवरून उड्या मारताना दिसत आहेत. 

ग्रँड डायमंड सिटी हॉटेलच्या कॅसिनोमध्ये सुमारे 50 लोक अडकल्याचीही बातमी आहे, या प्रकरणात मृतांचा आकडा वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये आग अनेक तास धुमसत होती. सगळीकडे राडा झाला. हॉटेलच्या इमारतीवरून जळणारे साहित्य खाली पडत होते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पाचव्या मजल्यावरच्या बाल्कनीतून उड्या मारल्या. 

  • या अपघातात एकूण 53 जणांना वाचवण्यात यश आले .

आगीमुळे हॉटेलचा काही भाग कोसळला आहे. त्यानंतर अग्निशमन दलाने आगीवर 70 टक्के नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता आग लागली. अथक परिश्रमानंतर या अपघातात एकूण 53 जणांना वाचवता आले. आग इतकी भीषण होती की लोकांना वाचवण्यात टीमला अडचण येत होती. अग्निशमन दल आणि बचाव पथकासोबत स्थानिक लोकही सहभागी झाले आणि त्यांनी लोकांना वाचवण्यास सुरुवात केली.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 23 Saptember 2026: पैशांच्या बाबतीत बुधवार महत्त्वाचा दिवस! संपत्ती आणि समृद्धीचे नवे मार्ग मोकळे; 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये होणार भरघोस वाढ

Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

SCROLL FOR NEXT