America Crime Dainik Gomantak
ग्लोबल

America Crime: अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 जण ठार

America Crime: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. एकामागून एक अशा घटना समोर येत आहेत.

Manish Jadhav

America Crime: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. एकामागून एक अशा घटना समोर येत आहेत. कधी लोकांच्या घरात घुसून, कधी बार आणि रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करुन तर कधी गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार करुन हल्लेखोरांनी अमेरिकन पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. असे असूनही अमेरिकन पोलिस हातावर हात ठेवून शांत बसलेले दिसत आहेत. गुन्हेगारी घटनांची संख्या झपाट्याने वाढूनही अमेरिकन पोलिस गुन्हेगारांवर कारवाई करण्यात निष्पळ ठरत आहेत. ताज्या प्रकरणात, अमेरिकेतील मिनियापोलिसमधील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये मोठा गोळीबार झाला. या गोळीबारात संशयित बंदूकधाऱ्यासह तिघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अमेरिका (America) पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना दक्षिण मिनियापोलिसमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. याप्रकरणी अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोळीबारात दोन अधिकाऱ्यांव्यतिरिक्त चार नागरिकही जखमी झाले आहेत. मिनियापोलिस पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना घटनास्थळाजवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे. गोळीबाराची सविस्तर माहिती पोलिस पत्रकार परिषदेत देणार आहेत.

हल्लेखोराबाबत काहीही माहिती नाही

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोरही मारला गेला आहे, मात्र त्याने गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. बंदूकधारी व्यक्तीचे लक्ष्य कोण आणि का होते? पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात व्यस्त आहेत. फॉरेन्सिक तपासणीसाठी घटनास्थळावरुन नमुने गोळा करण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT