Rishi Sunak Dainik Gomantak
ग्लोबल

'एक रहो या मरो', Rishi Sunak यांनी पंतप्रधान होताच पक्षाच्या खासदारांना दिला हा संदेश

Rishi Sunak: 'एक रहो किंवा मरो' या मंत्रावर काम करण्याचा सल्ला ऋषी सुनक यांनी खासदारांना दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Rishi Sunak: ब्रिटनमधील राजकीय गदारोळात पंतप्रधानपदी निवडून आलेले ऋषी सुनक यांनी आपल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांना मोठा धडा दिला आहे. 'एक रहो या मरो' या मंत्रावर काम करण्याचा सल्ला ऋषी सुनक यांनी खासदारांना दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या बैठकीत ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी हा संदेश दिला. 42 वर्षीय सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. चर्चिल यांच्यानंतर ते ब्रिटनचे (Britain) सर्वात लहान पंतप्रधान असतील, ज्यांची उंची केवळ 5 फूट 6 इंच आहे, अशी एक गंमतही आहे. राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतल्यानंतर ते पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील. जाणून घेऊया, ऋषी सुनक पंतप्रधान झाल्याच्या चर्चेतून, आत्तापर्यंत काय घडलं आणि पुढे काय होणार...

काही महिन्यांतच तिसरा पीएम झाला आहे

अर्थव्यवस्था (Economy) रुळावरुन घसरल्याच्या आरोपांचा सामना करणाऱ्या लिझ ट्रस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान बनल्या. मात्र मंगळवारी त्या आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेणार आहेत. त्यानंतर राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेऊन त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील. या भेटीनंतर ऋषी सुनक राजा चार्ल्स यांचीही भेट घेणार आहेत. ट्रस यांनी गुरुवारी राजीनामा दिल्यानंतर सुनक यांचे नाव चर्चेत आले होते. त्यांच्यासमोर बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आणि पेनी मॉर्डोंट यांचे आव्हान होते. पण शेवटी हे दोघेही शर्यतीतून बाहेर पडले आणि भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.

विरोधक म्हणाले- ऋषी सुनक यांच्याकडे काय योजना आहे

सध्या ऋषी सुनक मंत्रिमंडळ कसे बनवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेरेमी हंट यांना अर्थमंत्री म्हणून ऋषी सुनक मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सध्या त्यांच्या सरकारमध्ये प्रत्येक प्रतिभावंताला स्थान दिले जाईल, असे सुनक सांगतात. टोरी पक्षाला उन्हाळ्यापासून दोनदा पंतप्रधान बदलावे लागले आहेत. मात्र, विरोधी पक्ष त्यावरुन आक्रमक होत आहेत. कामगार नेत्या अँजेला रेनर यांनी ट्विट करत म्हटले की, “टोरीने पंतप्रधान म्हणून काय करणार हे स्पष्ट न करता सुनक यांना मुकुट सोपविला आहे. त्यांना कोणताही जनादेश नाही. समस्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची योजना नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Arya Encounter: मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य एन्काऊंटरमध्ये ठार

IND vs AUS Semifinal: हरमनप्रीत कौरची चूक क्रांती गौडने सावरुन घेतली! एलिसा हिलीचा कॅप्टनने सोडलेला झेल, पण गोलंदाजाने केली कमाल VIDEO

दोना पावला दरोडा प्रकरणात 7 महिन्यानंतर अटक, उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार ताब्यात; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

'धार्मिक संघटनेकडून त्रास, आर्थिक संकट, बायका पोरांचा सांभाळ करणं शक्य होत नाही'; व्हिडिओ रेकॉर्ड करुन सिंधुदुर्गात मुस्लिम युवकाने संपवले जीवन

Rishabh Pant: ...पठ्ठ्यानं स्टाईल नाही बदलली, ऋषभ पंतचा गोलंदाजासोबतचा खुमासदार संवाद व्हायरल; सामन्यातील व्हिडिओने वेधले लक्ष Watch Video

SCROLL FOR NEXT