Arthur O Urso
Arthur O Urso Dainik Gomantak
ग्लोबल

'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'; प्रेग्नेंसीसाठी मॉडेल ऑर्थर ओ उर्सो कोणत्या पत्नीची निवड करणार?

दैनिक गोमन्तक

ब्राझिलिया : मुल जन्माला घालण्यासाठी कुठल्या पतीने 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' असं बोलल्याचं तुम्ही ऐकलंय का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची ओळख करुन देतोय, ज्याच्या बेबी प्लानिंगची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. तसा ब्राझिलमधील मॉडेल ऑर्थर ओ उर्सो नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असतात आणि यामुळेच नेहमी चर्चेतही असतात.

तब्बल 9 महिलांशी विवाह केलेल्या ऑर्थर यांना आता नव्या पाहुण्याचे वेध लागले आहेत. 9 पत्नींपैकी एकीने घटस्फोट घेतल्यानंतर तिची जागा एका लहान बाळाच्या रुपाने भरुन काढण्याची ऑर्थरची इच्छा आहे. मात्र यासाठी त्यांनी एक आगळावेगळा फंडाही शोधून काढला आहे. आपल्या 8 पत्नींपैकी कुणामुळे मुल होईल हे त्यांनाही माहित नाही. मात्र जी पत्नी पहिली येईल तिच्यापासून मुल बनवण्याचं ऑर्थरचं नियोजन आहे.

वाचायला, ऐकायला विचित्र वाटलं तरी या गोष्टीत सोळा आणे तथ्य आहे. आपल्या अशाच अजबगजब गोष्टींमुळे ऑर्थर नेहमीच वादात आणि त्यामुळेच चर्चेतही राहतो. ऑर्थरची पहिली पत्नी लुआना काझाकी आपल्या 7 सवतींसोबतच राहते. ऑर्थरने आपल्या 8 पत्नींना खुश ठेवण्यासाठी सेक्स रोस्टरही बनवलं होतं, ज्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. मात्र त्याचं रोस्टर फेल ठरलं कारण केवळ रोस्टरमध्ये नाव आहे म्हणून इच्छा नसताना त्याला आपल्या पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागत असत.

दरम्यान 'पहिले या पहिले घ्या' या तत्वाने मुल कसं होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती ऑर्थरने दिली नाही. मात्र ज्या पत्नीपासून मुल होणार ती वगळता बाकीच्या बायका त्या मुलाचं संगोपन करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऑर्थरच्या बाळाचं एक नाही तर तब्बल 8 मातांकडून संगोपन होणार आहे. सध्या असलेल्या 8 पत्नींपैकी कोणतीही पत्नी आपली विशेष आवडीची पत्नी नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या जसं प्लानिंग होतं, तसंच मुलाचं प्लानिंग करणार असल्याचं ऑर्थरचं म्हणणं आहे. आपल्या बऱ्याच बायकांना मुल नको आहे. मात्र त्यांना घरात बाळ आल्यास त्याचं स्वागत करायचं असल्याचंही ऑर्थरचं म्हणणं आहे.

ऑर्थरने मुलाची इच्छा व्यक्त करतानाच आपली चिंताही उघड केली आहे. त्याला वाटतंय की एका पत्नीला मुल झाल्यानंतर बाकीच्या पत्नींमध्येही मातृत्त्वाची भावना जागृत होईल. पण सध्यातरी मला पहिली जी पत्नी समोर येईल तिच्यापासून मुल हवं आहे. ऑर्थर हे इन्स्टावरही चांगलेच लोकप्रिय आहेत त्यांचे इन्स्टावर तब्बल लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. आता ऑर्थर मुलाच्या प्लानिंगसाठी कुठल्या पत्नीची निवड करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT