'हे' आहे जगातील सर्वात महाग चित्र, लागली 96 कोटींची बोली

मॅन रेच्या प्रसिद्ध 'ले व्हायोलॉन डी'इंग्रेस'ने जगातील सर्वात महागडे चित्र बनण्याचा विक्रम केला.
Le Violon d'Ingres
Le Violon d'IngresDainik Gomantak

मॅन रेच्या प्रसिद्ध 'ले व्हायोलिन'इंग्रेस'ने जगातील सर्वात महागडे चित्र बनण्याचा विक्रम केला. लिलावात विकला गेलेला हा सर्वात महागडा फोटो ठरला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो 1924 मध्ये काढण्यात आला होता. हा एका महिलेचा नग्न फोटो आहे जिला व्हायोलिन म्हणून चित्रित करण्यात आले. हा महिलेचा फोटो फोटोग्राफर मॅन रेच्या सर्वात प्रसिद्ध कामांपैकी एक आहे. (This is the most expensive picture in the world with a bid of 96 crores)

Le Violon d'Ingres
...स्वीडन करणार नाटो सदस्यत्वासाठी अर्ज, रशियाला मिळालं आव्हान

फोटोची मूळ प्रत $12.4 दशलक्ष, सुमारे 96 कोटी रुपयांना विकली गेली आहे. लिलावापूर्वी, ते 5 ते 7 दशलक्षांपर्यंत विकले जाईल अशी अपेक्षा करण्यात आली होती. पण जेव्हा त्याची बोली सुरू झाली तेव्हा त्याने आतापर्यंतचा सर्वात महागडा फोटो होण्याचा विक्रम केला आहे.

हा फोटो 1962 मध्‍ये विकत घेण्यात आला होता

लिलाव संस्‍था क्रिस्टीजच्‍या माहितीनुसार, न्यूयॉर्कच्‍या (New York) एका जोडप्याने 1962 मध्‍ये मॅन रे कडून हे महिलेचे चित्र विकत घेतले होते. या चित्रासह इतर कलाकृती, छायाचित्रे, दागिने देखील त्यांनी गोळा केले. हे चित्र जेकब आणि त्याची पत्नी रोझलिंड, शॅक्स फिफ्थ अव्हेन्यूचे माजी अध्यक्ष यांनी त्यावेळी विकत घेतले होते.

जेकबचा 1993 मध्येच मृत्यू झाला, तर रोझलिंडचा 2019 मध्ये मृत्यू झाला. या दाम्पत्याची मुलगी पेगी जेकब हिला तो लिलावात मिळाला होता. आई-वडिलांच्या प्रत्येक कलासंग्रहामागे एक कथा असते, असे ते म्हणायची. तसेच त्यांच्या परस्पर संबंधातील जवळीक देखील दर्शवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com