Boris Johnson Dainik Gomantak
ग्लोबल

बोरिस जॉन्सन यांनी महापौर असताना गर्लफ्रेंडसाठी केला होता सत्तेचा दुरुपयोग

बोरिस जॉन्सन यांच्याबाबत 2008 चे एक प्रकरण सध्या चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांच्याशी संबंधित प्रकरणे एकामागून एक समोर येत आहेत. जॉन्सन यांच्याबाबत 2008 चे एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. (Boris Johnson had abused power for a girlfriend when he was mayor)

त्या वेळी ते लंडनचे महापौर आणि हेन्ली येथील खासदार होते. बोरिस यांना एक तरुणी आवडत होती. त्यासाठी त्यांनी नगरपालिकेत नोकरीसाठी प्रयत्न देखील केले. आता त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, असा आरोप त्यांच्यार होत आहे.

सिटी हॉलमध्ये त्या मुलीची नियुक्ती रोखण्यात आली होती कारण जॉन्सन आणि त्या महिलेचे खूप जवळचे संबंध होते, जे अशा नोकरीसाठी योग्य नव्हते. किल्ट मेल्टहाऊस हे अलीकडेपर्यंत जॉन्सनच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते. ती महिला दुसरी कोणी नसून जॉन्सन यांची सध्याची पत्नी होती.

जॉन्सन यांच्यावर आणखी एका प्रकरणामध्ये दोषी ठरवल्याचा आरोप आहे. लंडनचे महापौर असताना त्यांनी अमेरिकन व्यावसायिक महिला जेनिफर अकुरे यांना सार्वजनिक कराच्या पैशातून बिझनेस टूर घडवली होती. अकुरेरीने नंतर कबूल केले की तिचे जॉन्सन यांच्यासोबत अफेअर होते.

2017 मध्ये दोघांमधील संभाषणाच्या टेप रेकॉर्डवरून असे दिसून आले आहे की 2008 मध्ये दोघांचे नाते होते. मात्र, त्यावेळी जॉन्सन विवाहित होते आणि 4 मुलांचा वडील देखील होता. बोरिस जॉन्सन हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात सतत वादांमध्ये सापडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT