Bill Gates latest News, Bill Gates News | Melinda gates News  Dainik Gomantak
ग्लोबल

बिल गेट्स यांचे अफेअर ठरलं घटस्फोटाचे कारण

बिल गेट्सच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल बोलली पत्नी मेलिंडा

दैनिक गोमन्तक

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा गेटल यांच्या सोबत लग्नाच्या 27 वर्षानंतर मे 2021 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता मेलिंडा गेट्सने पहिल्यांदाच बिल गेट्सपासून घटस्फोट घेण्याच्या कारणांबद्दल आपले मौन सोडले आहे. मेलिंडा गेट्स यांनीही बिल गेट्सच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल स्पष्ट केले त्या पुढे म्हणाल्या की, त्यांनी बिल यांना यासाठी माफ केले आहे. मात्र आता या आम्ही कधीच एकत्र येवू शकत नाही आसे स्पष्ट केले. (Bill Gates Extra marital affair was the reason for divorce)

मेलिंडा गेट्सने सीबीएस न्यूजच्या मॉर्निंग शो 'सीबीएस मॉर्निंग'मध्ये गेल किंगला एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने बिल गेट्सच्या (BIll Gates) विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगितले, 'मी निश्चितपणे क्षमा करण्यावर विश्वास ठेवते, बिल गेट्सचे तब्बल 20 वर्ष विवाहबाह्य संबंध होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या विधानात असे लिहिले आहे की, 'गेल्या 27 वर्षांत, आम्ही आमच्या तीन मुलांचे संगोपन केले आहे आणि जगभरातील लोकांना निरोगी आणि चांगले जीवन जगण्यास मदत करणारी एक अद्भुत संस्था तयार केली आहे. भविष्यातही आम्ही या मिशनमध्ये एकत्र काम करत राहू. पण एक जोडपे म्हणून आपण एकत्र आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही असे आम्हाला वाटते. (Bill Gates News Updates)

ऑगस्ट 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 1987 मध्ये जेव्हा मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये (Microsoft) रुजू झाली तेव्हा दोघांची भेट कशी झाली. 1994 मध्ये दोघांनी हवाईमध्ये लग्न केले. त्यांनी मिळून बिल आणि मेलिंडा गेट्सची स्थापना केली आणि जगभरातील देशांमध्ये एकत्र धर्मादाय कार्य सुरू केले. त्यांच्या संस्थेने जगभरातील संसर्गजन्य रोग आणि बालकांचे लसीकरण यावर उल्लेखनीय कार्य केले. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने भारतातही पोलिओ निर्मूलनासाठी मोठे काम केले.

बिल गेट्स यांची ही महिला सहकारी एक चीनी महिला असून तीचे नाव शेली वांग असे आहे. सहेली वांग आणि बिल गेट्स यांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तथापि, शेली वांग यांनी स्वतः या अफवा असल्याचे सांगत बिल गेट्स आणि त्यांच्या प्रेमप्रकरणांचे दावे फेटाळून लावले आहेत.

कोण आहे शेली वांग ?
चिनमधून अमेरिकेत आलेली शेली वांग 36 वर्षांची आहे. ती सध्या सिएटल शहरात राहते आणि लग्न केलेले नाही. ती एक व्यावसायिक भाषांतरकार आहे. गेट्स फाउंडेशन व्यतिरिक्त तिने येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये काम केले आहे. शेली वांग ने ब्रिघम यंग यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आहे. शेलीला मंडारीन, इंग्रजी आणि कॅन्टोनिज भाषा येते. एका वृत्तानुसार, गेट्स फाऊंडेशनमध्ये फ्रीलांस काम केले आहे. या व्यतिरिक्त तिने कोरोना कालावधीपूर्वी अमेरिका आणि शांघायच्या विमानांमध्येही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT