Benjamin Netanyahu vs Donald Trump latest news Dainik Gomantak
ग्लोबल

Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

Netanyahu Rejects Donald Trump Claims Israel: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

Manish Jadhav

Netanyahu Rejects Donald Trump Claims Israel: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. ट्रम्प यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले होते की, पश्चिम आशियात इस्रायल त्यांच्या आदेशांचे पालन करतो. यावर कडक भूमिका घेत नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, ते किंवा ट्रम्प एकमेकांच्या सूचनेनुसार काम करत नाहीत.

यरुशलेम न्यूज सिंडिकेटच्या 'इंटरनेशनल पॉलिसी समिट 2026' मध्ये बोलताना नेतन्याहू म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मी सांगतो ते सगळंच करत नाहीत, आणि मी देखील ते सांगतील त्या प्रत्येक गोष्टीचे पालन करत नाही. आम्ही स्वतंत्र आणि सार्वभौम देशांचे नेते आहोत; त्यामुळे काही मुद्द्यांवर आमची मते वेगळी असणे स्वाभाविक आहे."

नेतन्याहू यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी मतभेद होत असले तरी, दोन्ही बाजू आपापल्या राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देतात. इस्रायलच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहीन, असे सांगत त्यांनी जोडले की, अनेकदा आमचे विचार जुळतात तर कधी जुळत नाहीत. परंतु आम्ही एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा, नेतृत्वाचा आणि जनतेप्रती असलेल्या कटिबद्धतेचा नेहमीच आदर करतो.

या वादाची ठिणगी गेल्या शुक्रवारी पडली, जेव्हा ट्रम्प यांनी 'एक्सियोस' ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, लेबनॉनवरील हल्ले थांबवण्यासाठी ते इस्रायलच्या लष्करी मोहिमांवर प्रभाव टाकू शकतात. ट्रम्प म्हणाले होते की, इस्रायल माझा खूप आदर करतो आणि मी सांगेन तसेच करतो. नेतन्याहू यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगतानाच त्यांनी अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय इस्रायलचे अस्तित्वच राहणार नाही, असेही विधान केले होते.

सध्या लेबनॉनमधील (Lebanon) इस्रायलच्या लष्करी कारवाईवरुन वॉशिंग्टन आणि यरुशलेममध्ये राजनैतिक तणाव वाढला. ट्रम्प यांच्या मते, इस्रायलच्या या पावलांमुळे इराणसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनीही या कराराचा विरोध करणाऱ्या इस्रायली कॅबिनेट सदस्यांना कडक इशारा दिला. 28 फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या इराणविरोधातील युद्धात अमेरिका आणि इस्रायल एकत्र लढत असताना, आपल्या एकमेव शक्तिशाली मित्रावर टीका करणे अयोग्य असल्याचे वेन्स यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG ODI: सौरव गांगुलीच्या 'त्या' रेकॉर्डची बरोबरी करायला किंग कोहली सज्ज! मैदानात पाऊल ठेवताच रचणार इतिहास; इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका गाजवणार

Donald Trump: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा!' डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी वृत्तपत्राचा इशारा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

Labh Drishti Yog 2026: तिजोरी हाऊसफुल्ल होणार, व्यापाऱ्यांना बंपर फायदा! शनी-मंगळाचा 'लाभ दृष्टी योग' बदलणार 4 राशींचे नशीब; सर्व अडचणींचा द एंड

Road Accident: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा! दोन ट्रकांच्या भीषण धडकेत चिरडली पिकअप; 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी VIDEO

8th Pay Commission Latest Update: पगारवाढच नाही, तर बोनस आणि ग्रॅच्युइटीमध्येही होणार मोठा फेरबदल! 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT